सुटबुटवाल्या तंग पोरी
नेसुन साडी येते का घरी
नकली फुलांच्या रंगिन शहरी
वासानं येते मला, भोवळ घेरी ।धृ।
नको ही धास्ती, हसतीया नुसती
करुया दोस्ती, बगेल वस्ती
तुझी नी माझी यारी गं
फुलांची भाषा, भुंगे मधमाशा
शिवारी नशा, मोकळ्या दिशा
झिंगणार कधी तु गं माळावरी
सुटबुटवाल्या तंग पोरी
नेसुन साडी येते का घरी
नकली फुलांच्या रंगिन शहरी
वासानं येते मला, भोवळ घेरी ॥१॥
चल रानात जावू , गुज मनात ठेऊ
उन्हात गाऊ, डोळ्यात पाहू
झोक्याची धरुनिया दोरी गं
भाकर हिरव्या मिरचीचा ठेचा,
अंबट गोड गाबुळ चिंचा
फिका ईथे गं बरगर पिज्जा
वाकून बघते पाडाची कैरी
सुटबुटवाल्या तंग पोरी
नेसुन साडी येते का घरी
नकली फुलांच्या रंगिन शहरी
वासानं येते मला, भोवळ घेरी ॥२॥
राघुंचा थवा, रोज नवा नवा
येता जाता खावा, राणी राणमेवा
पिकल्यात सार्या बोरी गं
हा धुंद रानवारा, जाऊ नको शहरा
गाव माझा खरा, नको रंगवू चेहरा
चल तुळस पुजूया दारी
सुटबुटवाल्या तंग पोरी
नेसुन साडी येते का घरी
नकली फुलांच्या रंगिन शहरी
वासानं येते मला, भोवळ घेरी ॥३॥
शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.