सांगली – शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि शब्दरंग साहित्य मंडळ यांच्या वतीने डोंगरी साहित्य पुरस्कारासाठी गद्य विभागासाठी (नाटक , कथा , कादंबरी, ललित इत्यादी ) आणि पद्य विभागासाठी साहित्यकृती मागवण्यात येत आहेत, अशी माहिती शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत पाटील यांनी दिली.
गद्य विभागासाठी उद्योजक बळीराम पाटील चरणकर उत्कृष्ठ गद्य साहित्य पुरस्कार , उद्योजक विश्वास डफळे पुरस्कृत कै. निवृती रावजी डफळे विशेष गद्य साहित्य पुरस्कार तर पद्य विभागासाठी सामजिक कार्यकर्ते तानाजीराव पाटील पुरस्कृत उत्कृष्ठ पद्य साहित्य पुरस्कार आणि विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकशित झालेल्या साहित्यकृतीच पाठवाव्यात. साहित्यकृतीच्या दोन प्रति ३० जानेवारी २०२४ पर्यंत पोहचतील अशा वेळेत पाठवणे. नंतर आलेल्या साहित्यकृती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
मुख्य दोन पुरस्कार स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रुपये २५०० रोख आणि दोन विशेष पुरस्कार दिले जाणारआहेत. डोंगरी साहित्य पुरस्कारांचे हे चौथे वर्ष असून फेब्रुवारी २०२४ मध्ये पणुंब्रे वारुण ता. शिराळा येथे होणाऱ्या १२ व्या डोंगरी साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते वितरण होणार आहे. साहित्यकृती ३० जानेवारी २०२४पर्यंत वसंत पाटील, मु.पो.पणुंब्रे वारुण, ता. शिराळा जि. सांगली पिन -४ १५४०५ या पत्त्यावर पाठवाव्यात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.