पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साऊथ जबाबदार नाही, शाश्वततेप्रति भागीदार देशांपैकी प्रत्येकाची ही सामाईक जबाबदारी आहे: पीयूष गोयल
नवी दिल्ली – जागतिक पर्यावरणाच्या हानीसाठी ग्लोबल साऊथ देश जबाबदार नाहीत तर त्या विकसित देशांमुळे हे नुकसान झाले आहे ज्यांनी कमी खर्चिक ऊर्जेचा लाभ घेतला असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघ भागीदारी शिखर परिषद 2024 च्या उद्घाटन सत्रात बोलत होते. शिखर परिषदेत इटली, इस्रायल, भूतान, बाहरीन, अल्जेरिया, नेपाळ, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, म्यानमार, कतार या भागीदार देशांचे व्यापार मंत्री आणि कंबोडियाच्या वाणिज्य मंत्रालयाचे गृह सचिव उपस्थित होते.
गोयल यांनी अधोरेखित केले की प्रत्येक भागीदार देशाच्या पर्यावरण आणि शाश्वततेप्रति सामायिक जबाबदाऱ्या आहेत, मात्र शिखर परिषदेत उपस्थित असलेले देश पर्यावरणाच्या हानीसाठी जबाबदार नाहीत. म्हणूनच, सामायिक पुरवठा साखळी आणि स्थिरतेप्रति जबाबदाऱ्या सामायिक परंतु भिन्न जबाबदारीच्या माध्यमातून पूर्ण कराव्या लागतील असे ते म्हणाले. सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे मात्र पर्यावरणाच्या समस्येतील त्यांच्या योगदानाच्या आधारे सर्वांना जबाबदारी देणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले.
सहभागींना संबोधित करताना गोयल म्हणाले की, भारत ग्लोबल साऊथच्या देशांना विश्वासाने मैत्री आणि भागीदारीचा हात देतो. अधिवेशनात नमूद केलेले सामान्य मुद्दे सामायिक करताना, त्यांनी निदर्शनास आणून दिले की उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी स्थिरता, अंतराळ, उपग्रह आणि शाश्वतता यावर सर्वाधिक मते मांडली आणि आज जगाला अशा चर्चेची गरज आहे यावर त्यांनी भर दिला.
भागीदार देशांच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याबाबत बोलताना गोयल यांनी भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी तरलतेची गरज अधोरेखित केली. याबाबत अधिक विशद करताना त्यांनी नमूद केले की जीवनशैलीबरोबरच तरलतेचे देखील सखोल चिंतन आवश्यक आहे. संसाधनांचा नाश जगाला निवासयोग्य ठिकाण बनू देत नाही. म्हणूनच जगाला जीवनशैली आणि चक्राकार अर्थव्यवस्थेवर चिंतन करावे लागेल. ते म्हणाले की, उत्तम जीवनशैलीच्या ध्येयाचा पाठपुरावा करताना आपण कचरा आणि कार्बन फूटप्रिंटबद्दल जागरूक असले पाहिजे. उपभोग पद्धतीवर अंकुश ठेवण्याची गरज आहे आणि पर्यावरणीय आव्हान हे निर्मितीतून उत्सर्जित होणारे कार्बनचे कार्य नाही. ते म्हणाले की उपभोगामुळे उद्भवणारे कार्बन फूटप्रिंटचे कार्य म्हणून या समस्येकडे पाहणे आवश्यक आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.