मुसळधार पाऊस
मुसळधार पावसाने
सुरू झाला पावसाळा
वर्षा ऋतुचे आगमन
संपला आता उन्हाळा….
घटक जीवनात महत्वाचा
पाण्याचे मुल्य सजीवांना
पाऊस पडला तरच
जल मिळेल सर्वांना…..
महापुर तर कोठे कोरडेच
निसर्गाचे पडते कोडे
मानवाला सोडवताना
पावलापावली मिळतात धडे…
समतोल राखण्यासाठी
नका करू वृक्षतोड
एक तरी झाड लावू
सृष्टी वागेल गोड…
नको इतका बरसू की,
हानी पोहोचेल चराचराला
दुष्काळ नको कोठे की,
तडफड होईल जीवाला….
सीमा मंगरूळे तवटे वडूज
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.