शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रातील एक जुने ग्रंथालय आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजीत झालेल्या ५० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गोड स्मृती जागविणारा इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने ‘उत्कृष्ट साहित्यकृती’ पुरस्कार देण्यात येतात. त्याचा वितरण सोहळा गेल्या २३ वर्षापासून संपन्न होतो आहे.
आपटे वाचन मंदिराच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी विविध साहित्य प्रकारांची निवड मान्यवर परिक्षकांकडून करण्यात येते. आजपर्यंत यामध्ये विविध मराठी साहित्यिक, प्रकाशक सहभागी झाले आहेत. या वर्षी शनिवार (ता. २४ जून २०२३) हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा वितरण सोहळा होत आहे, अशी माहिती डॉ. विलास शहा व सुषमा दातार यांनी दिली आहे.
पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट साहित्यकृती अशा –
इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार –
घामाची ओल धरून कवी – आबासाहेब पाटील, मंगसुळी
प्रकाशक – शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा
उत्कृष्ट गद्य साहित्यकृती
गान गुणगान एक सांगीतिक यात्रा – सत्यशील देशपांडे, पुणे
प्रकाशक – राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे.
लक्षणीय पद्य साहित्यकृती
कै. वसंतराव दातार स्मृत्यर्थ पुरस्कार
ऐहिकाच्या मृगजळात – पूजा भडांगे, उस्मानाबाद.
प्रकाशक स्वयं प्रकाशन, पुणे
कै. सुलभा मगदूम स्मृत्यर्थ पुरस्कार
ऐन विणीच्या हंगामात – पुनीत मातकर, यवतमाळ.
प्रकाशक – लोकवाङ्मय गृह, मुंबई
लक्षणीय गद्य साहित्यकृती
प्राक् – सिनेमा – अरुण खोपकर, मुंबई.
प्रकाशक- राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे
पृथ्वीचं आख्यान – अतुल देऊळगावकर, लातूर.
प्रकाशक राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे *
सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह
कया मनातल्या जनातल्या विद्या पेठे, मुंबई
प्रकाशक- सुकृत प्रकाशन, सांगली
विनायकराव श्रीधर देशपांडे उत्कृष्ट कादंबरी
टार्गेट असद शाह – वसंत लिमये, पुणे.
प्रकाशक – इंद्रायणी साहित्य, पुणे.
महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट मराठी अनुवादित साहित्यकृती
ताऱ्यांची जीवनगाथा – पुष्पा खरे, पुणे.
प्रकाशक – राजहंस प्रकाशन प्रा. लि., पुणे
वसुंधरा मुकुंद अर्जुनवाडकर उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती
जगण्याचा उत्सव- विश्वास वसेकर, पुणे.
प्रकाशक संस्कृती प्रकाशन, पुणे
पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती
वेणूच्या गोष्टी (भाग १ ते ४) – विनोद गायकर, मुंबई.
प्रकाशन वेणू प्रकाशन, मुंबई
रागिणी दादासो जगदाळे स्मृत्यर्थ युवा पद्मरत्न पुरस्कार
डियर तुकोबा – विनायक होगाडे, इचलकरंजी.
प्रकाशन – मधुश्री पब्लिकेशन, पुणे
मुकुंद कुलकर्णी यांचे स्मृत्यर्थ उत्कृष्ट स्थानिक परिसर साहित्यिक पुरस्कार
सुभाष काडाप्पा, कबनूर
उत्कृष्ट वाचक पुरस्कार –
सौ. प्रेमा खंजिरे, इचलकरंजी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.