मोहिनी या मराठी अल्बममधून अभिनेत्री शुभांगी गायकवाडने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचित…
प्रश्नः मोहिनी या अल्बमबद्दल थोडक्यात काय सांगाल ?
शुभांगी गायकवाडः निर्माते सुशील बनसोडे यांच्या एस बी प्रोडक्शन व साईनाथ राजाध्याक्ष यांच्या सप्तसूर मुझिक या यु ट्युब चॅनेलवर मोहिनी हा अल्बम प्रदर्शित झाला आहे. या अल्बममध्ये माझ्यासोबत सुशील बनसोडे, आशिष देवकाते हे कलाकार आहेत. सचिन कांबळे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे तर केवल वाळंज यांनी याचे गीत गायले आहे. या अल्बममध्ये मला माझी वेगळी अदा सादर करण्याची संधी मिळाली आहे ती प्रेक्षकांना निश्चितच पाहायला आवडेल.
प्रश्नः आपले मराठी बोलीतील ग्रामीण बाज असणारे विनोदी रिल्स खूप गाजत आहेत. याबद्दल काय सांगाल ?
शुभांगी गायकवाडः सोशल मिडियावर मी तयार केलेले व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. मराठी कोल्हापुरी ग्रामीण बोलीवर माझी पकड आहे. ग्रामीण बाज, ती लय लोकांना लयभारी वाटते आहे. यातून वेगळाच आनंद मिळतो. हे विनोद मी स्वतः लिहीले आहेत. या व्हिडिओचे दिग्दर्शनही मी स्वतः केले आहे. हे विनोदी ढंगाचे किस्से लोकांना खूप पसंत पडत आहेत हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. यातून मला अभिनय करण्यास प्रेरणा मिळत आहे. लोकांचा प्रतिसादच कलाकाराला मोठा करत असतो. या व्हिडिओमधून माझी वेगळी छाप प्रेक्षकांमध्ये पडली आहे. कलाकारासाठी ही एक मोठी समाधानाची बाब असते.
प्रश्नः आत्तापर्यंतच्या आपल्या अभिनय प्रवासाबद्दल थोडक्यात…
शुभांगी गायकवाडः क्रांती या पहिल्याच शॉर्टफिल्मसाठी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मला मिळाला. त्यानंतर मला बऱ्याच जाहीरातीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली. यातूनच विविध अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. पाखरू, मनसुटले धुंद, एकवीरा माऊली प्रेमाची साऊली, हावीशी वाटे, मोहिनी, मन चिंब पावसाळी अशा विविध अल्बममध्ये मी काम केले आहे. लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. अभिनयक्षेत्रात काम करण्याचे माझे स्वप्न होते. ही जिद्दच मला या क्षेत्राकडे ओढली. मला यासाठी कोणाचीही साथ मिळाली नाही. असे असतानाही मी आपले करियर यातच करायचे या ध्येयाने मी याकडे वळले. मराठी बरोबरच मला हिंदी अल्बममध्येही काम करण्याची संधी मिळत आहे.



https://www.instagram.com/reel/CtjPeE-Inbl/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==