नांदेड – येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य या साहित्यकृतींचा यामध्ये समावेश असतो. तरी इच्छुकांनी साहित्यकृती पाठवावी, असे आवाहन संयोजक डॉ. माधव जाधव यांनी केले आहे.
पुरस्काराचे स्वरुप ५००० रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे असून दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य यासाठी ग्राह धरले जाणार आहेत. तसेच उर्वरित तीन साहित्यप्रकारांतून निवडलेल्या प्रत्येक प्रकारातील एका साहित्यकृतीचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी ग्रंथाच्या दोन प्रती, प्रवेशिकेत आपले पूर्ण नाव, पासपोर्ट फोटो, पत्ता, भ्रमणध्वनी, ग्रंथाचे नाव, पृष्ठ संख्या, किंमत व प्रकाशकाचे नाव आदी नमुद करावे. साहित्यकृती पाठविण्याची अंतिम मुदत १० मे २०२५ ही आहे.
साहित्य पाठविण्याचा पत्ता –
संयोजक, अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार
द्वारा डॉ. माधव जाधव, ६, कुळवाडी, साईनगरी, तरोडा पोस्ट ऑफीस,
काबरानगर जवळ, वाडी (बु.), नांदेड-४३१६०५. भ्र. ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.