December 6, 2022
Professor Dr Kisanrao Patil Dnynparmpara Literature award Pachora
Home » प्रा. डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी काव्य संग्रह पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

प्रा. डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी काव्य संग्रह पाठवण्याचे आवाहन

प्रा. डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय वाडःमय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

जळगाव येथील मराठीचे प्राध्यापक व ज्ञानपिपासू अभ्यासक, प्राचार्य डॉ. किसन महादू पाटील यांचे गेल्यावर्षी २ मार्च २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पाटील सरांच्या स्मृती कायम राहाव्यात या हेतूने विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरा स्थापन केलेली आहे. या परंपरेच्या माध्यमातून प्रा.डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय व खानदेश स्तरीय असे दोन वाडःमय पुरस्कार मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रकाशित कलाकृतीस देण्यात येत आहेत. यासाठी यंदाच्या वर्षी काव्य संग्रह पाठवण्याचे आवाहन प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले आहे.

पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरीय पुरस्कार अकरा हजार रोख, शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह तर खानदेशस्तरीय पुरस्कार रोख पाच हजार , शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह असे आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या वर्षीचे पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेच्या वतीने पुणे येथील मनोहर सोनवणे यांच्या ब्रॅन्डफॅक्टरी व युवराज पवार यांच्या कथासंग्रहास देण्यात आले होते. या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पाचोरा यांचे वतीने हे दोन्ही पुरस्कार काव्य या वाडःमय प्रकारासाठी देण्यात येणार आहेत. तेव्हा मराठी भाषेतील १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीतील प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाच्या प्रत्येकी दोन प्रती पाठवण्याचे आवाहन प्रा. डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्यावतीने डॉ. अशोक कौतिक कोळी आणि सहकाऱ्यांनी केले आहे. पुस्तके ३१ मार्च २०२२ पर्यंत प्रा. डॉ. वासुदेव वले, (कार्याध्यक्ष, मसाप, शाखा पाचोरा), तलाठी कॉलनी, पाचोरा जि. जळगाव संपर्क क्रमांक ९४२०७८८३३६ या पत्यावर पाठवावीत.

Related posts

‘ श्रीशब्द ‘ काव्यपुरस्कार जाहीर

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठवण्याचे आवाहन

फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे ‘एक दिवस बळीराजासाठी

Leave a Comment