‘ दिवसा थंडावा तर रात्री ऊबदारपणा! ‘
‘ थंडी अशीच कमी राहणार!’.
आठवड्याने ३ दिवसासाठी थंडी वाढणार!माणिकराव खुळे
सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणात दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीच्या जवळपास एक डिग्रीने कमी तर पहाटेचे किमान एक डिग्रीने वाढलेले जाणवत आहे. त्यामुळे तेथे दिवसा आल्हाददायक पणा तर रात्री ऊबदारपणा जाणवत आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात परिस्थिती अशीच 👆असली तरी पहाटेचे किमान तापमानातील वाढ ही अत्याधिक असल्यामुळे थंडीचा प्रभाव काल शनिवार दि.११ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात कमी झाला आहे.
-बं.उपसागराततून वारे महाराष्ट्रावर आर्द्रता आणत असल्यामुळे पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. १८ जानेवारीपर्यंत थंडीचा प्रभाव असाच कमी जाणवणार आहे.
सोमवार दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यानच्या तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवेल, असे वाटते.
थोडक्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात असाच थंडीचा चढ-उतार जाणवेल, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
