साताराः जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्यावतीने प्रतिवर्षी माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या कथा स्पर्धेचे हे 21 वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी विनोदी कथा पाठवण्याचे आवाहन अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे.
विनोदी साहित्य व विनोदी लेखन करणारे लेखक यांच्या बाबतीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या आणि नवोदित विनोदी लेखकांना प्रोत्साहन व व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने गुंफण अकादमीतर्फे ही स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळतो.
स्पर्धेसाठी पाठवावयाची विनोदी कथा ही सुटसुटीत असावी. दीर्घकथा नसावी. स्पर्धेसाठी आलेल्या कथांचे तज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करण्यात येते. त्यानंतरच निकाल जाहीर करण्यात येईल. विजेत्या कथालेखकांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. लेखकांनी स्वरचित विनोदी कथा कागदाच्या एका बाजूस सुवाच्य अक्षरात लिहून अथवा टाईप करून पाच ऑगस्टपर्यंत पोहोचेल अशी पाठवावी. अधिक माहितीसाठी 8080335289 / 9850659708 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
स्पर्धेसाठी कथा पाठवण्याचा पत्ता
डॉ. बसवेश्वर चेणगे, अध्यक्ष, गुंफण अकादमी, मसूर, ता. कराड, जि. सातारा पिन – 415106
किंवा
विकास धुळेकर, एफ 17, गार्डन सिटी, राधिका रोड, सातारा पिन – 415002
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.