माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ ॲपवर 29 व 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसारित झालेल्या मुलाखतीचे दोन्ही भाग…
वृषाली पाटीलः महाआवास अभियानात कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.ही योजना आपण प्रभावीपणे कशी राबवली ? यासाठी आपण कसे नियोजन केले ?
संजयसिंह चव्हाणः कोल्हापूरमध्ये जागेच्या किंमती खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे जागा घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. यासाठी शासनाने बहुमजली इमारतीचा विचार करण्यास सांगितले होते. यातून जास्तीत जास्त लाभार्थी समाविष्ट घेऊ शकतील. कमी जागेमध्ये जास्तीच जास्त लोकांना लाभ देण्याचा आमचा प्रयत्न होता. शासकिय योजनेच्या गरीब जनतेला लाभ देण्याचा केलेला हा प्रामाणिक प्रयत्न असल्यानेच हा पुरस्कार मिळाला आहे.
वृषाली पाटीलः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी आपण जिल्हा परिषदेच्यावतीने कोणते उपक्रम राबवत आहात ?
संजयसिंह चव्हाणः ग्रामीण भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 1976 शाळा आहेत. कागल तालुक्यातील बांदे गावात लेक्चर कॅप्चुअर स्टुडिओ तयार केला. ऑनलाईन शाळा शिक्षण सक्षमीकरण प्रणाली आम्ही जिल्ह्यातील शाळात राबवत आहोत. यात चांगल्या शिक्षकांना बोलावून त्यांचे व्हिडिओ तयार केले आहेत. यापुढे आता फ्युचेरिस्टिक क्लासरुम तयार करत आहोत. यामध्ये डिजिटल शिक्षणासाठी लागणारी सर्व व्यवस्था यामध्ये केली आहे. सध्या जिल्ह्यातील सहा शाळांमध्ये हा प्रयोग सुरु आहे.
वृषाली पाटीलः ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आपण कोणते उपक्रम राबवत आहात ?
वृषाली पाटीलः हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलासाठी असणाऱ्या कुप्रथा बंद करण्याचा ठराव केला आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारचे ठराव होऊन कुप्रथा बंद करण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करत आहात ? घन कचरा अन् सांडपाणी व्यवस्थापन याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषद कशाप्रकारे काम करत आहे ? मागासवर्गीयांच्या विकासासाठी जिल्हा परिषद कशा पद्धतीने काम करत आहे ? शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा शेतकरी उन्नत व्हावा यासाठी जिल्हा परिषद कोणते प्रयत्न करत आहे ? यासह विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी करा या ऑडिओवर क्लिक…