कळकी... उंच बांबूच्या बेटा मधली भली लांबडी एक कळकी उंच बांबूच्या बेटा मधली भली लांबडी एक कळकी आभाळाचे पोट फोडून उडी आपली लांबच फेकी राकट होती, कणखर होती, अंगावरती असंख्य काटे राकट होती, कणखर होती, अंगावरती असंख्य काटे राकटतेच्या खुणाच जपल्या, तिने अंगावरची फोटून काटे कधी बिचारी हसली नाही, कधी बिचारी रुसली नाही कधी बिचारी हसली नाही, कधी बिचारी रुसली नाही कधी न केला थोडा दंगा, कधी न घेतला लटका पंगा पहाट काळी दवात भिजली, तरी थोडीही थरथरली नाही पहाट काळी दवात भिजली, तरी थोडीही थरथरली नाही आग ओकीत दुपार आली, तेव्हांही ती हरली नाही मावळतीची उन्हे सांडता एक पाखरू अलगत आले मावळतीची उन्हे सांडता एक पाखरू अलगत आले कळकी वरती बसून एकटे गीत नभाचे गाऊ लागली तेव्हा कळकी थोडी हसली, तेव्हा कळकी थोडी हसली अंगावरचे विसरून काटे गीत पाखरू आळवीत होते कळकीवरती बसून एकटे गीत एकटे आळवीत होते कळकीवरती बसून एकटे कवी - राम बेनके
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.