नाव त्याचे लावते… बांधुनी काळे मणी ती नाव त्याचे लावते यामुळे का त्यास पत्नी मालकीची वाटते का नको तेथेच लोकांची नजर रेंगाळते ती बिचारी लाज उघडी फाटक्याने झाकते पोट भरण्याचा तिला पर्याय मिळतो शेवटी चाळ पायी बांधुनी लोकांपुढे ती नाचते न्याय पैशाने विकत मिळतो तिने हे पाहिले फाटकी झोळी तिची अन्याय सोसत राहते आंधळ्या प्रेमात त्याच्या सत्य बघणे टाळते तो चुका करतो तरी ती नित्य पोटी घालते सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी

Home » नाव त्याचे लावते…
previous post
next post