February 22, 2025
Lets register your participation now The Online Jagar of classical Marathi!
Home » चला पटपट सहभाग नोंदवा ! अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!
काय चाललयं अवतीभवती

चला पटपट सहभाग नोंदवा ! अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?

आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून तो महासंवाद कडे पाठवायचा आहे. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही ( वाचन )आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अशा काही अटी आहेत. तरी अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आणि व्हिडिओ पाठवा.

हे व्हिडिओ माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत यासाठी आपले व्हिडिओ इथे पाठवा

ईमेल: dgiprdlo@gmail.com या ईमेलवर अथवा या व्हॉट्सअँप क्रमांकावर. ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६ यावर पाठवावेत.

महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading