मुंबई – भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मराठी साहित्य संघातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी साहित्याविषयी ओढ निर्माण व्हावी म्हणून मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा आयोजित केली आहे, तरी विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ . मनोज वराडे व अशोक बेंडखळे यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी मराठी साहित्यात तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्यासमोरील आव्हाने असे दोन विषय निश्चित केले असून या विषयावर कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त ७०० शब्दांत ब्लॉग लेखन करुन २४ डिसेंबर २०२४ पर्यंत sahityasangha@gmail.com या ईमेलवर आपल्या ब्लॉगची लिंक संपूर्ण नाव, महाविद्यालयीन शिक्षण तपशील आणि भ्रमणध्वनीसह पाठवण्यात यावी.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ३००० रुपये रोख, द्वितीय पारितोषिक २००० रुपये रोख व तृतीय पारितोषिक १००० रुपये रोख असे असून जानेवारी २०२५ मध्ये ब्लॉग लेखकांचे संमेलनात विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – मनोज वराडे भ्रमणध्वनी ९८६९३३६३३७
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.