February 6, 2023
Marathi Language opportunity every where book review
Home » मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र
करिअर अन् स्पर्धा परिक्षा

मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र

स्वागत नव्या पुस्तकाचे

सुरेश वांदिले यांचे मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र हे पुस्तक मराठी विषय घेऊन अध्ययन, अध्यापन करणार्‍यांसाठी मार्गदर्शन करणारे असे आहे. या पुस्तकास प्रमोद मुनघाटे यांची प्रस्तावना आहे.

मानवाच्या सर्वांगीण विकासात भाषा महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. म्हणूनच चाकाच्या शोधापेक्षा भाषेचा शोध खूप महत्त्वाचा मानला जातो. अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक ज्ञानशाखा निर्माण झाल्या. काही ज्ञानशाखा मागेही पडल्या. पण या घडामोडीत भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस अधिकच ठळकपणे अधोरेखित होत गेले. भाषा कधी माध्यम तर कधी साधन बनून ज्ञानक्षेत्रांच्या विकासात मौलिक योगदान देत राहिली. परंतु, भाषेच्या क्षमतांचा, तिच्या सर्वस्तरीय उपयोजनाचा स्वतंत्र विचार होताना दिसत नाही. तो झाला पाहिजेत. भाषेवर प्रभुत्व संपादन करून कोणतीही व्यक्ती सर्वांगीण प्रगती करू शकते. विविध क्षेत्रात आत्मविश्‍वासाने वावरू शकते. त्यासाठी भाषा आणि भाषिक कौशल्यांचे शिक्षण खूप आवश्यक आहे. ते घेऊन व्यक्ती स्वत:चा विकास करून घेऊ शकते. सर्वच भाषिक कौशल्ये विविध क्षेत्रात काम करण्यासाठी आत्मविश्‍वास देतात. त्या त्या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी मदतगार ठरतात. विविध नोकर्‍यांबरोबर स्वतंत्र व्यवसाय उभे करण्याचे आत्मबळ देतात. हे भान प्रस्तुत पुस्तक वाचणार्‍या प्रत्येकाला येईल. हे पुस्तक विद्यार्थ्यांना भाषेच्या अभ्यासाकडे वळण्यासाठी दिशादर्शन करेल. त्यांनी येथे चर्चा केलेल्या क्षेत्रांचा स्वत:च्या जीवनाचा मार्ग म्हणून विचार करावा. कारण हे पुस्तक विविध क्षेत्रातील संधीची वाट दाखवणारे आणि तिकडे जाण्यासाठीचे मार्गदर्शन आहे.

पुस्तकाचे नाव – मराठी भाषाः संधी आहे सर्वत्र
प्रकाशक : शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर
किंमत : 100/-
पुस्तकासाठी संपर्क: 8329812012

Related posts

साईप्रसाद अभिनयाकडे कसा वळला ?

सवयी बदला भविष्य बदलेल

मिसेस अचीव्हर सुजाता रणसिंग चालवतात शाळा !

Leave a Comment