बिऱ्हाड आंदोलनात दिलेले नाशिक जिल्हा बँकेचे आश्वासन सरकार पूर्ण करणार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना देणार मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे राजू शेट्टी व संदीप जगताप यांना आश्वासन..
गुरुवारी (१५ जून रोजी) सह्याद्री अतिथी गृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालंदर पाटील व इतर स्वाभिमानीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एक तास राज्यातील विविध शेतकरी विषयावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये द्राक्ष बेदाणा, एकरकमी एफ आर पी , नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान , नाशिक जिल्हा बँक , पीक विमा व नुकसानग्रस्त पिकांची भरपाई या विषयावरती सखोल चर्चा झाली.
या बैठकीमध्ये राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्हा बँकेचा विषय अतिशय अभ्यासपूर्ण मांडला . 62 हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवायच्या असतील तर या बँकेला आठशे ते हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज सरकारने तात्काळ दिले पाहिजे. त्यासाठी आर्थिक तरतूद केली पाहिजे. किंवा राज्य बॅंकेला शासनाने हमी देऊन बँकेला दीर्घकालीन कर्ज देऊन शेतकऱ्यांना ओटीएस दिले पाहिजे. अशी मागणी या बैठकीमध्ये केली. त्यासाठीचा संपूर्ण आकडेवारीचा हिशोब राजू शेट्टी व संदीप जगताप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समोर मांडला. नाशिक जिल्हा बँक वाचवणे ही आमची जबाबदारी आहे. आणि आम्ही तात्काळ या विषयावरती निर्णय घेऊ. बिऱ्हाड आंदोलनात दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करू. असा शब्द यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाला दिला. यावेळी या बैठकीला सावकार मदनाईक, राजेंद्र गड्ड्यांवर, रवींद्र मोरे , प्रशांत डिक्कर,महेश खराडे , वैभव कांबळे, संदीप राजोबा ,एड. संदे , यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाशिक जिल्हा बँकेचा विषय राजू शेट्टी यांनी अतिशय ताकदीने मांडला. सहा महिन्यापूर्वी बिऱ्हाड आंदोलनाला शासनाने दिलेला शब्द याची आठवण करून दिली. व तो न पाळल्यामुळे जनतेत कसा असंतोष आहे हे सरकारला समजून सांगितले म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बिऱ्हाड आंदोलनात दिलेला शब्द आम्ही पाळू . असे आश्वासन आम्हाला दिले .या सरकारने हा शब्द पाळवा. ही आम्हाला अपेक्षा आहे . आणि जर आता वारंवार बैठका होऊन सरकार शब्द पाळणार नसेल तर मग पुन्हा रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना