एलिमेंटरमध्ये कस्टम विजेट्स कसे तयार करायचे जाणून घेण्यासाठी भेटा सुरज सुतार यांना वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये
कोल्हापूर – एलिमेंटरमध्ये कस्टम विजेट्स कसे तयार करायचे ? यावर कोल्हापूर वर्डकॅम्पमध्ये सुरज सुतार विशेष मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूर वर्डकॅम्प ११ आणि १२ जानेवारीला कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट भरविण्यात आला आहे, तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वर्डकॅम्पच्या संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
आजकाल वर्डप्रेस वापरून वेबसाइट तयार करणे अगदी सोपे झाले आहे. एलिमेंटर Elementor हे प्लगइन वापरून विविध घटकांचा (elements) वापर करून आकर्षक वेबसाइट सहज तयार करता येते. पण काही सेक्शनसाठी जसे की स्लायडर किंवा कस्टम शॉर्टकोडसाठी, आपल्याला अॅड-ऑन्स किंवा पेड प्लगइन्सची गरज भासते. अशा वेळी, कस्टम विजेट्स तयार करून तुम्ही ही आवश्यकता पूर्ण करू शकता आणि आपल्या वेबसाइटवर हवी तशी फीचर अॅड करू शकता.
सुरज सुतार यांच्याबद्दल
सुरज सुतार हे कोल्हापूर येथील वॉलस्टार टेकनॉलॉजी प्रा. लि. या कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांना सात वर्षांहून अधिक वेब डिझाइन आणि डेव्हलपमेंटचा अनुभव आहे. या कालावधीत त्यांनी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले असून, ग्राहकांच्या गरजेनुसार वेबसाइट विकसित केली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.