चित्रपट तपस्वी स्व. सूर्यकांत मांडरे यांच्या 22 व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांची नात स्वरुपा प्रशांत मांडरे -पोरे यांनी जागवलेल्या आठवणी…
22 ऑगस्ट ही तारीख आली की जीव नुसता कासावीस होतो. ‘पपाजीच्या बरोबरच्या आठवणी एका मागे एक मनात नुसत्या गर्दी करत राहतात. किती कौतुक करावं आणि कुठल्या आठवणी सांगाव्यात, हेच कळत नाही. चित्रपट अभिनेता कलाकार, चित्रकार, शिल्पकार, लेखक अश्या अष्टपैलू आजोबांची नात, ह्या अभिमानाने आकाश ठेंगणे होऊन जाते.
आम्ही कसे मोठे होऊन नाव कमवावे यासाठी कायमच ते आम्हांला मार्गदर्शन करत असत. त्याचं मराठमोळ रांगड रूप जरी असलं तरी ते मनाने खुप हळवे होते.
स्वरुपा प्रशांत मांडरे – पोरे, सातारा
सगळ्या नात्याच्यापुढे एक अतूट नात आहे, ते म्हणजे माझे आजोबा पपाजी पाठदुःखत असली तरी आम्हाला पाठीवर बसवून घोडाघोडा खेळणारे मला अजूनही आठवतात. आम्ही कसे मोठे होऊन नाव कमवावे यासाठी कायमच ते आम्हांला मार्गदर्शन करत असत. त्याचं मराठमोळ रांगड रूप जरी असलं तरी ते मनाने खुप हळवे होते.
मला आठवतंय मी एकदा तापाने फनफनले होते. त्यावेळस ते इतके बैचैन झाले होते. डॉक्टर ज्यावेळस मला इंजेक्शन द्यायला घरी आले त्यावेळस त्यांचे डोळे भरून आले होते. डॉक्टरांना सांगत होते ती इंजेक्शनला खूप घाबरते. हळूच द्या तिला, त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
तसेच काही मोठ्या चुका झाल्या तर कडक आवाजात कान उघडणी करणारे आम्हाला ओरडणारे, शिस्त लावणारे माझे आजोबा मला अजूनही आठवतात आणि अजून एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे कधी मी रुसले तर माझ्याशी लहान होऊन रुसूबाई रुसू म्हणत काही नकला करून मला हसवायचे.
त्यांच्यामुळे मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. त्यांनीच मला पेन्सिल कशी धरायची ? त्याचा दाब किती असावा ? व सिमीट्रिकल ड्रॉईंग कसे काढावे ? याचे मार्गदर्शन केले. त्याच्यांकडून शिकावे तेवढे कमीच. शिस्तबद्द, नीटनीटकेपणा वक्तृत्व कौशल्य अजून खूप काही. ते माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्यामागे ठामपणे उभे असायचे. त्यांनी दिलेले संस्कार हे माझ्या जीवनाच्या चांगल्या वाईट प्रसंगासाठी मोलाचे ठरतात.
त्यांच्या ” धकाटीपाती “या पुस्तकातून त्यांचा जीवन प्रवास मांडला आहे. त्यांच्या विषयी बोलताना शब्द कमी पडतात. या नात्याचे ऋण कसे फेडावे हेच कळत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.