April 1, 2023
Beauty of Ramtirth And Chitri Drone view
Home » रामतिर्थ अन् चित्रीचे सौंदर्य…(व्हिडिओ)
पर्यटन

रामतिर्थ अन् चित्रीचे सौंदर्य…(व्हिडिओ)

आजरा तालुक्यातील रामतिर्थ आणि चित्री धरण परिसराचे सौंदर्य पर्यटकांना निश्चितच भुरळ घालते. पावसाळ्यात हिरव्यागार शेतांनी आणि निसर्गरम्य विविधतेने नटलेला हा परिसर डोळांना एक वेगळाच सुखद आनंद देतो. रामतिर्थ येथे भगवान राम आणि शिवाचे मंदिर आणि नैसर्गिक धबधबा पर्यटकांचा आकर्षण ठरला आहे. इतिहास तज्ज्ञांच्यामते वनवासात असताना श्रीराम इथे राहीले होते. यामुळे या परिसराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

चित्री धरणाचा परिसर हा हिरव्या घनदाट जंगलाने वेढलेला आहे. यामुळे पक्षी आणि विविध वन्यजीवांचे हे आश्रयस्थान झाले आहे. १८१ फुट उंचीचे हे धरण परिसरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बांधले गेले आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य मनाला निश्चितच उत्साही करणारे असे आहे.

Ramtirth Chitri

( सौजन्य – डी. सुभाष प्रोडक्शन )

Related posts

Photos And Videos : गगनबावडा अन् बावडेकर वाडा…

‘आर्क्टिक सर्कल’ वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ)

दूधसागराची साहसकथा!

Leave a Comment