December 8, 2023
obstacles in Yoga And Meditation Samadhipad Sutra
Home » समाधिपाद – योग साधनेतील विघ्ने कोणती ?
विश्वाचे आर्त

समाधिपाद – योग साधनेतील विघ्ने कोणती ?

समाधिपाद सूत्र – २९.तत:प्रत्यक्चेतनाधिगमोअपिअंतरायाभावश्च.

ईश्वरप्रणिधानामुळे जीवात्म्याचा साक्षात्कार होतो आणि अनेक विघ्ने नाहीशी होतात. प्रणवाच्या उपासनेमुळे जीवात्म्याचा, अंत:सामर्थ्याचा साक्षात्कार तर होतोच; पण त्याबरोबर जी विघ्ने योगाभ्यासात संकटे निर्माण करू शकतात, ती विघ्ने ही आपोआप नाहीशी होऊ लागतात. 

सूत्र – ३० व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रांतिदर्शनालब्धभूमिकानवस्थितत्वानि चित्त विक्षेपास्ते अंतराया:|

या आधीच्या सूत्रात विघ्ने नाहीशी होतात हे सांगितले. पण ती विघ्ने कोणती ?

व्याधी – शारीरिक त्रास.

स्त्यान – काहीच करू नये असे वाटणे. (अंगचोरपणा)

संशय – मी योगाभ्यास करू शकेन की नाही, केला तर योगप्राप्ती होईल की नाही ? असा संशय येणे.

(इथे संशयात्मा विनश्यति हे लक्ष्यात ठेवावे.)

प्रमाद – समाधीच्या साधनांचे अनुष्ठान करण्यात कंटाळा करणे. आलस्य – शरीराला व मनाला जाड्य आल्यामुळे ध्यानात मन रमत नाही.

अविरती – विषयांबद्दल आसक्ती वाढलेली असते, विकारांच्या प्रभावाखाली असल्याने आसक्तीत वाढ होऊन योगाबद्दल कंटाळा येऊ लागतो.

भ्रांतिदर्शन – योगाभ्यास आणि त्याचे फायदे हे सारे खोटे आहे असे वाटणे.

अलब्धभूमिकत्व – समाधी अवस्थेपर्यंत पोचता न येणे.

अनवस्थित्व – समाधीपर्यंत पोचून सुद्धा तिथे चित्तस्थैर्य न झाल्याने ध्येयपूर्तीच्या आधीच समाधीतून बाहेर येणे.

व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा आपल्या कार्यसिद्धीत शारीरिक, मानसिक आणि वैचारिक अडथळे येतच असतात. त्या सर्वांवर मात केल्याशिवाय ध्येयप्राप्ती, संकल्पपूर्ती होत नाही.

लेखन – अ. रा. यार्दी, धारवाड

Related posts

ब्रह्मत्वासाठी दृढ निश्चयाने अभ्यास करायला हवा

ऋतंभरा प्रज्ञा कशास म्हणतात ?

साधनेत मन रमण्यासाठी…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More