समाधिपाद – ईश्वर म्हणजे कोण ?
सूत्र – २४क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्ट: पुरुषविशेष ईश्वर:.
क्लेश
क्लिश्नंतीति क्लेशा:–ज्याच्यापासून दु:ख होते, त्याला क्लेश म्हणतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पाच प्रकारचे क्लेश आहेत.
कर्म
या क्लेशामुळे शुभ, अशुभ आणि मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे होतात.
विपाक
विपच्यन्त इति विपाका:.जे परिपक्व होतात त्यांना विपाक म्हणतात.अर्थात् सकाम कर्मांची फळे सुख, दु:ख, जात, आयुष्य आणि भोग अशी आहेत. आपल्याकडे ‘कर्मविपाकसिद्धांत’प्रसिद्धच आहे.
आशय
आ-फलविपाकात्चित्तभूमौ शेरत इत्याशय:.फळ परिपक्व होईतोपर्यंत चित्ताच्या भूमीत ते पडून राहिलेले असते.त्याला वासना अर्थात्’आशय’ म्हणतात.
या चार गोष्टींशी जो संबंधित नाही,त्याला ‘पुरुषविशेष ईश्वर:’असे म्हणतात.
ईश्वर:
ईशनशील इच्छामात्रेण सकलजगदुद्धरणक्षम:-अर्थात् इच्छामात्रेकरून संपूर्ण जगाचा उद्धार करण्यास समर्थ असलेला, तो ईश्वर.
लेखन – अ. रा. यार्दी, धारवाड
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.