कवितेतील वऱ्हाडीचे बोल वाचताना चाकोलीवानी उमटली त्यात अंतरीची ओल ! हा अनुभव रसिकांना येईल ! म्हणूनच प्रा. इंगोले यांनी आपल्या कविता लोकभाषेत लिहिल्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा पाया त्यांनी घालून दिला.
-पद्मश्री डाॅ. वि. भि. कोलते.
माजी कुलगुरू, नागपूर विद्यापीठ, नागपूर.
भुलाई या काव्यसंग्रहातील केवळ भाषेचे स्वरूप महत्त्वाचे नाही ते तर महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर त्यातील काव्यामधली काव्यगुण अधिक महत्त्वाचे आहेत. काव्यात कवीच्या अंतःकरणातील हळुवार भावभावना व्यक्त झाल्या पाहिजेत. खेड्यात जीवन कंठलेल्या प्रा. प्रतिमा इंगोले यांच्या भुलाईतील प्रत्येक कविता हा त्यांच्या अंतःकरणाचा आविष्कार आहे, आणि तो काव्यात्मक आणि कल्पना आविष्कारने नटलेला आहे. भाषेच्यादृष्टिने त्यात जशी त्यांची प्रतिमा उमटलेली आहे, तसेच त्यांच्या सर्वच कवितांत त्यांच्या प्रतिमेचे सौंदर्य व्यक्त झालेले आहे. या भुलाईतील कोणतीही कविता याची साक्ष देईल. कल्पना सौंदर्य व प्रतिभेचा आविष्कार ही त्या कवितांची प्रमुख वैशिष्ठ्ये होत, असे मला वाटते. त्यांच्या मनोगतात देखील हे गुण दिसून येतात.
झोक्यावर झोका
हालल्या भावना
धावल्या झोंबल्या
बिलगल्या मना !
या यातील काही ओळीच पहा ना ! त्यांच्या कवितेतील वऱ्हाडीचे बोल वाचताना चाकोलीवानी उमटली त्यात अंतरीची ओल !हा अनुभव रसिकांना येईल ! म्हणूनच प्रा. इंगोले यांनी आपल्या कविता लोकभाषेत लिहिल्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा पाया त्यांनी घालून दिला.
कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा उत्स्फूर्त अभिप्राय
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.