कोल्हापूरः संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य आहे असे प्रतिपादन डॉ. रमेश वरखेडे यांनी केले.
ते शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित तुकाराम अभ्यासाच्या नव्या दिशा या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की तुकारामांच्या अभंगाकडे नव्या पिढीच्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. तुकारामांच्या अभंगांचा अस्तित्वलक्षी, संस्कृतीकेंद्री, सांप्रदायिक, अभंगाचे सावळे सौंदर्यशास्त्र इत्यादी पद्धतीने अभ्यास करता येतो.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये तुकारामांच्या अभंगातील कवित्वाचा शोध संशोधक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. तसेच तुकारामांकडे कवी म्हणून कसे पहावे याचे विवेचन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. मंगला वरखेडे, डॉ. अरूण शिंदे, डॉ. गोमटेश्वर पाटील, तसेच मराठी विभागातील संशोधक विद्यार्थी, एम.ए. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.