March 29, 2024
Poet Dhammpal Ratnakar Poetry awards
Home » रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर

  • २५ मे रोजी माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
  • काजरेकर, दास, मुरूमकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०१९ ते २०२२ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. चार वर्षांतील आठ संग्रहांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून पुरस्कार प्रदान समारंभ २५ मे रोजी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे.

पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि कवी :

१. फक्त सैल झालाय दोर- पद्मरेखा धनकर (चंद्रपूर ),
२. भवताल आणि भयताल- दीपक बोरगावे (पुणे),
३. उसवायचाय तुझा पाषाण- कविता मुरूमकर (सोलापूर),
४. मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं- हबीब भंडारे (औरंगाबाद ),
५. सुन्नतेचे सर्ग- गोविंद काजरेकर(सावंतवाडी),
६.तुकोबा- राजेंद्र दास (कुर्डुवाडी, बार्शी),
७. टिळा- केशव देशमुख (नांदेड)
८. लेखणी सरेंडर होतय- कीर्ती पाटसकर (मुंबई).

पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून डॉ. रफीक सूरज आणि डॉ. विजय चोरमारे यांनी काम पाहिले.

कोविड काळामध्ये रत्नाकर काव्य पुरस्काराची प्रक्रिया राबवण्यात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यंदा चार वर्षांतील पुरस्कार एकत्रितपणे देण्याचा निर्णय साहित्य सभेने घेतला. त्यानुसार निवड समितीने चार वर्षांतील उत्कृष्ट आठ संग्रहांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार रुपये, गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार प्रदान समारंभ येत्या २५ मे रोजी सकाळी दहा वाजता शिवाजी विद्यापीठ, राजस्थान केंद्रीय विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आदी विद्यापीठांचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कारही याचवेळी प्रदान करण्यात येणार आहेत. परीक्षक समितीच्यावतीने डॉ. रवींद्र ठाकूर आणि डॉ. रफीक सूरज यांची प्रमुख उपस्थिती असेल. ज्येष्ठ कवी डॉ. दिलीप पां. कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी पुरस्कार प्राप्त कवींचे कवीसंमेलन होईल.

धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार यापूर्वी श्रीधर नांदेडकर, श्रीकांत देशमुख, वीरधवल परब, कल्पना दुधाळ, संजीवनी तडेगावकर, अरुण इंगवले, पी. विठ्ठल, सुरेश सावंत, अजय कांडर, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ आदींना देण्यात आला आहे. समारंभास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, कार्याध्यक्ष दि. बा. पाटील आणि कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.

Related posts

गोविंद पाटील यांचा बालकवितासंग्रह शिवाजी विद्यापीठ अभ्यासक्रमात

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याचा व्हावा प्रयत्न

भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगाराचे बदलते स्वरूप

Leave a Comment