April 14, 2024
Anusaya Jadhav Memory Sahitya award Nanded
Home » अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी आवाहन
काय चाललयं अवतीभवती

अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

नांदेडः येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. माधव जाधव यांनी दिली आहे.

१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र यापैकी एका साहित्यकृतीस हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख व मानपत्र असे असून या वाङ्मयप्रकारातील पहिल्या साहित्यकृतीची प्रथम आवृत्ती या पुरस्कारासाठी पाठवावी. उदा. पहिला कवितासंग्रह किंवा पहिला कथासंग्रह पाठवावा. तसेच प्रवेशिकेवर आपले संपूर्ण नाव, पासपोर्ट फोटो, पत्ता, भ्रमणध्वनी, ग्रंथाचे नाव, पहिली आवृत्ती दिनांक, पृष्ठ संख्या, किंमत, प्रकाशन, प्रकार नमूद करावे. प्रकाशित ग्रंथाच्या दोन प्रति 10 मे 2024 यापूर्वी मिळतील या बेताने पाठवाव्या.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता:
संयोजक, अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार
द्वारा डॉ. माधव जाधव, ०६, ‘कुळवाडी’, साई नगरी, तरोडा पोस्ट ऑफिस, काबरा नगर जवळ, वाडी (बु.), नांदेड – ४३१ ६०५ भ्र.: ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४

Related posts

मातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे कोल्हापूर येथे आयोजन

कातळशिल्पांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक

Leave a Comment