April 5, 2025
Reason Behind the increase in heat in Maharashtra
Home » महाराष्ट्रात उष्णतेत कशामुळे वाढ झाली आहे ?
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात उष्णतेत कशामुळे वाढ झाली आहे ?

दिवसा व रात्रीही उष्णतेत वाढ

गुरुवार (ता. २८ ) ते रविवार (ता. ३१ मार्च ) दरम्यानच्या चार दिवस (रंगपंचमी व नाथषट्ठी) पैकी फक्त शनिवारी (ता. ३० मार्चला) एक दिवस मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवेल, असे वाटते.

सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारी ३ चे कमाल तापमान हे ४० ते ४२ अंश सेलिअसच्या श्रेणीत जाणवत असुन ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ अंशानी अधिक आहे.

सध्याची उष्णता, दुपारच्या कमाल तापमानाच्या ९५ व्या टक्केवारीत स्पष्ट करतांना असे म्हणावे लागेल कि २५ मार्च नंतरच्या येणाऱ्या पाच दिवसात म्हणजे २५ ते ३० मार्च पर्यन्त मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील मराठवाडा व लगतच्या विदर्भातील जिल्ह्यात तसेंच मध्य महाराष्ट्रातील धुळे , जळगांव, नाशिक, नगर अशा काही जिल्ह्यातील, कमाल तापमान नोंदणाऱ्या एकूण सर्व केंद्रापैकी ९५ टक्के केंद्रावर दुपारचे निम्न पातळीतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस जाणवेल तर केवळ उर्वरित ५ टक्के केंद्रावर मात्र भाग बदलत निम्न पातळीतील ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानपेक्षा अधिक दुपारचे कमाल तापमान (म्हणजे ४१, ४२ अंश सेल्सिअस) जाणवेल. तसेच रात्री चा असह्य उकाडाही ह्या परिसरात अधिक जाणवणार असुन तो तसाच ३० मार्चपर्यंत जाणवेल.

त्यामुळे भले उष्णतेच्या लाटेची कसोटी जरी परिपूर्ण होत नसली तरी महाराष्ट्रातील ह्या भागात दिवसा उष्णतेची काहिली तर रात्री सध्या उकाडा जाणवत आह, व ते असेच पुढेही ३० मार्चपर्यन्त जाणवेल, अशा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कश्यामुळे सध्या महाराष्ट्रात उष्णता वाढली आहे?

मार्च ते मे हा ३ महिन्याचा मान्सूनपूर्व हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाकी खुप बदल घडवून आणतो. कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो. दिवसा व रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. ह्याच दरम्यान पाकिस्तान, अफगाणिस्तान व राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली झाली तर वायव्य दिशेकडून गुजरात, अरबी समुद्रावरून वारे, उष्णता व आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आदळतात व उष्णतेची जबरदस्त लाट मुंबईसह कोकणात महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा जाणवते.

पूर्व मोसमी (मार्च ते मे ) हंगामात जेंव्हा दोन प्रति -चक्री वादळे, अथवा प्रति-विवर्ते (अँटीसायक्लोन) किंवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरे बंगालच्या उप  सागरात किंवा किनारपट्टीच्या भू भागावर तयार होतात तेंव्हा ह्या दोघांच्या मधे वाऱ्याची विसंगती  (विंड डिसकंटीनुईटी ) तयार होते. म्हणजेच वारे एकमेकांच्या विरुद्ध महाराष्ट्रात तसेच देशाच्या मध्यावर  वाहू लागतात. अरबी समुद्राच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर बंगालच्या उपसागराच्याबाजूला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. ह्या दोघांमध्ये जी निर्वात पोकळी तयार होते तिलाच ‘ वारा खंडितता (विंड डिसकंटीनुईटी ) म्हणतात.

हंगामानुसार घडणाऱ्या प्रणल्यांनुसारच देशात पूर्व-मोसमी( मार्च, एप्रिल, मे असे ३ महिने )ह्या हंगामा मधील ‘ वारा खंडितता ‘ ही प्रणाली सुद्धा ठळक वैशिष्ठ्याची असते. आणि ह्या प्रणालीमुळे देशात  १५ ते २० अंश अक्षवृत्त दरम्यान उच्चं दाब क्षेत्रे तयार होतात. व काही कालावधी नंतर ते विरळही होत असतात.

आज ही वारा खंडितता प्रणालीमुळे समुद्रसपाटी पासून ९०० मीटर उंचीपर्यन्त हवेच्या कमी दाबाचा आस हा दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यन्त पसरला असुन ह्याची रुंदीही काही किलोमीटर मध्ये असुन त्यामुळे तेथे वारा शांत असतो. हवेच्या दाबाच्या रेषाचे व वारा दिशांचे जोड क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात आर्द्रतायुक्त उष्ण हवा लोटली आहे. सौराष्ट्र व कच्छ, उत्तर कर्नाटकात तसेच नैऋत्य राजस्थानात उष्णतेची लाट सदृश्य स्थिती जाणवत आहे. म्हणून ह्या पाच दिवसात महाराष्ट्रात अति नसली तरी उष्णता वाढलेली आहे.

माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading