तुकारामांचा शोध ही निरंतर चालणारी गोष्ट – प्रा. समीर चव्हाण
तुकारामांचा शोध ही निरंतर चालणारी गोष्टअसे प्रतिपादन प्रा. समीर चव्हाण यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने आयोजित त्यांच्या अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात खंड एक आणि दोन या ग्रंथाची निर्मितीप्रक्रिया आणि संत तुकारामांच्या अभंगाची विविध निरूपणे या विषयावर मुक्त संवाद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात पुस्तकाच्या खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –
खंड १ – https://amzn.to/3JTjx1F
खंड २ – https://amzn.to/4bdHjBg
ते पुढे म्हणाले की, तुकारामाचे अभंग हे आपल्या परंपरेला तपासून घेतात. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, कबीर, गालीब, मीरा या परंपरेबरोबर, सूफी विचारधारेचा प्रभाव तुकारामांच्या अभंगावर असलेला दिसतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे प्रा. प्रवीण बांदेकर आणि प्रा. रणधीर शिंदे यांनी या ग्रंथावर चर्चा केली. प्रवीण बांदेकर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, अखईं तें जालें हा ग्रंथ तुकारामांच्या अभंगाचे आधुनिक निरूपण असून आजच्या काळाच्या संदर्भात तुकारामांचे अंभग खूप काही सांगू पाहतात. प्रा. रणधीर शिंदे यांनी तुकारामांच्या अभंगावर झालेल्या आजवरच्या निरूपणापेक्षा चव्हाण यांचा ग्रंथ कसा वेगळा आहे तसेच तुकाराम समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे याची मांडणी केली.
संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रा. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुत्रसंचालन सुस्मिता खुटाळे तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. अविनाश सप्रे, प्रा. शरद नावरे, प्रा. अवनीश पाटील, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. प्रभंजन माने, प्रा. अक्षय सरवदे, प्रा. शिवकुमार सोनाळकर, प्रा. धनंजय देवळालकर, प्रा. निलांबरी जगताप आदी उपस्थित होते.
१. रणधीर शिंदे – संत तुकारामांच्याबद्दल कोणत्या अभ्यासाने तुम्हाला समृद्ध केले, कोणता अभ्यास तुम्हाला जवळचा अन् पूर्णत्वाचा वाटतो ?
समीर चव्हाण – संत तुकारामांच्यावरील वैकुंठगमनावरील अभ्यासाने मला अधिक जवळ केले.
२. रणधीर शिंदे – संत तुकारामांच्या कवितेचा अभ्यास अनेक अंगानी करता येऊ शकतो. या कविकडे आपण कसे अन् कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ?
समीर चव्हाण – संत तुकारामांवर असणारी मला शक्य होतील तितकी सर्व निरुपणे मी प्रथम जमा केली. यात मला अनेक ठिकाणी संत तुकारामांनी म्हटलेले नाही असे अर्थ सुद्धा यात घेतले गेल्याचे आढळले. त्यामुळे कवितेतील बारकावे चुकू शकतात. तुम्ही वेगळ्याच मार्गाने भरकटू शकता. दक्षिण दर्शनामध्ये मुळ अर्थ अन् अतिरिक्त अर्थ असे दोन्ही दिले आहेत. वाचकाला त्याला हवा आहे तो अर्थ तो घेऊ शकतो. असे मला संत तुकारामांच्या कवितेबाबत करू शकतो असे वाटले अन् मी तसे केले. दातेंच्या शब्दकोशाचा मी आधार घेतला आहे. शासकिय गाथेमध्ये सुधारणा केल्या आहेत. पण देहू प्रतिमध्ये काहीही बदल केलेला नाही त्यामुळे देहू प्रतच मी वापरली आहे.
३. रणधीर शिंदे – संत तुकाराम अभ्यासताना वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या, संप्रदायाच्या खुणा अन् साम्य तुम्हाला कसे जाणवत गेले ?
समीर चव्हाण – संत तुकारामांना संत नामदेवांनी स्वप्नात उपदेश दिला असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांचा प्रभाव संत तुकारामांवर झालेला आढळतो. चैतन्य संप्रदांचाही त्यांच्यावर प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. संत तुकारामांच्या रचनेत सुफी संप्रदायाचीही शैली पाहायला मिळते. वैदिक परंपरा तुकारामांनी पूर्णपणे नाकारली असे म्हणता येत नाही कारण जे हवे आहे ते त्यांनी घेतले आहे. या सर्वावरील पुरावे शोधावे लागेल. तुकारामांच्या रचनेत पाली भाषेतील शब्द आढळतात ते त्यांनी जाणीव पूर्वक वापरले असावेत असे वाटते.
४. प्रविण बांदेकर – संत नामदेव अन् संत तुकाराम यांच्याबद्दल काय सांगाल ?
समीर चव्हाण – संत नामदेव हे महाराष्ट्रातून पंजाबमध्ये गेले आहेत. त्यांची दृष्टी व्यापक आहे. याच दृष्टिकोन संत तुकारामांमध्ये दिसून येतो. त्यामुळे नामदेवांचा त्यांच्यावर प्रभाव होता असे म्हणता येईल.
५. प्रविण बांदेकर/रणधीर शिंदे – तुकारामांच्या रचनांचे वर्गीकरण विविध पद्धतीने झाले आहे. या वर्गीकरणाचा शोध आपण कसा घेतला ?
समीर चव्हाण – तीनशे चारशे रचना घेतल्या त्यामध्ये वेगवेगळेपण जाणवले. ज्या आवडल्या त्यांना मी खुणा करत गेलो. यामध्ये वर्गीकरण करावे असे वाटले. ज्याला ज्या आवडतील त्या ते स्वीकारतील यातून हे वर्गीकरण केले. समग्र घटक समजल्याशिवाय तुकाराम समजणे शक्य नाही. सगळ्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय तुकाराम गाथा समजणे अशक्य आहे.
६. प्रविण बांदेकर/रणधीर शिंदे – तुकाराम गाथेचा वेगवेगळ्या अंगानी विचार करू लागतो तेंव्हा तुकाराम किती खोलात उतरले आहेत हे जाणवते. याकडे कसे पाहाता ?
समीर चव्हाण – कविता समजून घेताना शब्दशा अर्थ, शब्दाच्या शक्यता तपासून पाहाव्या लागतात. त्यामुळे तुमचा मार्ग चुकत नाही.
७. रणधीर शिंदे – तुम्ही गणितातील तज्ज्ञ आहात. गणिती पद्धतीने तुकारामांकडे तुम्ही कसे पाहाता…
८. प्रविण बांदेकर – नव्या पिढीमध्ये अभ्यास करताना व्याकरणाचा विचार केला जात नाही. तुम्ही याकडे कसे पाहाता…
९. रणधीर शिंदे – तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा महाराष्ट्र व अन्यत्र कसा प्रभाव पडला आहे. असे आपणास वाटते…
१०. रणधीर शिंदे – तुकाराम अभ्यासताना शब्दांच्या अर्थांचे वेगळेपण जाणवले का ?
११. शासकिय गाथा अन् देहू गाथा यामधील फरकाबद्दल थोडक्यात काय सांगाल…
अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात पुस्तकाच्या खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –
खंड १ – https://amzn.to/3JTjx1F
खंड २ – https://amzn.to/4bdHjBg
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.