October 4, 2024
Sammer Chavan Book on Tukaram Gatha
Home » Privacy Policy » अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात…
संशोधन आणि तंत्रज्ञान

अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात…

तुकारामांचे कार्य क्रेंदस्थानी ठेवून वैदिक, बौद्ध, भागवत, नाथ, सूफी अशा अनेक परंपरांचे अवलोकन आणि त्या अनुषंगाने मराठी, हिन्दी, उर्दू, पंजाबी इत्यादी भाषांमधल्या जवळपास तीनशे रचनांवर विस्तृत चर्चा असे या खंडाचे स्वरूप आहे. हा खंड जिज्ञासा, व्यक्तिमत्त्व, संतत्व, कवित्व आणि दर्शन या विषयांना धरून सात अध्यायांमध्ये आणि शासकीय गाथेचे स्वरूप व श्री
तुकारामगाथा: शब्दार्थ संदर्भकोश – परिचय या दोन परिशिष्टांसह साकारला आहे.

अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात पुस्तकाच्या खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –
खंड १ – https://amzn.to/3JTjx1F
खंड २ – https://amzn.to/4bdHjBg

पहिल्या खंडात ये‌ऊ न शकलेल्या किंवा केवळ उल्लेखस्वरूपात आलेल्या जवळपास पंधराशे रचना या खंडात घेतल्या आहेत. या रचना विषयांना अनुसरून एकूण तेहतीस भागांमध्ये विभागल्या आहेत. प्रत्येक रचनेखाली सोपेकठीण, एकार्थी-अनेकार्थी व प्रचलित-अप्रचलित शब्दांचे अर्थ दिले आहेत. कधी कधी अर्थ केवळ शब्दांचे इतर पैलू पुढे आणण्याकरिता दिल्यासारखे झाले आहे पण रचना समजून घेण्यासाठी उपयुक्त हो‌ईल म्हणून समाविष्ट केले आहेत. जिथे अर्थनिश्चिती करता आली नाही. तिथे एकाहून अधिक अर्थांच्या शक्यता समोर ठेवल्या आहेत किंवा प्रश्न उपस्थित
केले आहेत. अर्थनिश्चिती करताना एकूण‌एक शब्दांचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न राहिलाय. काही ठिकाणी अर्थनिर्णयनात एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी या ग्रथांचा आधार झाला किंवा पडताळा करून पाहता आला. शब्दांच्या पुढे कंसामध्ये शब्दांचे पूर्वरूप किंवा शब्दकोशातले रूप दिले आहे. जिथे आवश्यक आहे तिथे अधिक माहितीसाठी शेरा दिला आहे. रचना शासकीय गाथेतून घेण्यात आल्या आहेत पण जिथे अर्थनिश्चिती करता आली नाही तिथे तळेगाव, देहू, पंढरपूर
इत्यादी प्रतींमधले पाठभेद लक्षात घेतले आहेत.

अखईं तें जालें या ग्रंथाचे वेगळेपण काय? मी महाराष्ट्राच्या परिवेशात किंवा परिप्रेक्ष्यात तुकोबांचा अभ्यास केला. दिलीप चित्रेंनी तो जागतिक संदर्भात पण कवितेच्या आणि काही प्रमाणात संस्कृतीच्या पद्धतीने तो मांडला. या दोन्हींमधला टप्पा राहून गेला होता ना! तो होता हिंदुस्तानचा किंवा संपूर्ण भारताचा. ती मधली जागा या ग्रंथाने भरून काढली. यामुळे आपल्याला एक संपूर्ण युनिट पहायला मिळते; तुकोबांचा जो काही अभ्यास आहे तो महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जागतिक संदर्भांत पहायला मिळतो. अशाप्रकारची लिंक आमच्या अभ्यासात आहे. म्हणून त्या अर्थाने आम्ही आता एका कुटंबातले आहोत असे म्हणेन. तुकोबांचा जो संप्रदाय आहे तो वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायाची पायाभरणी ज्ञानेश्वरांनी केली. ज्ञानेश्वरांची पाळेमुळे आपण पाहिली तर ती
नाथसंप्रदायामध्ये आहेत. नाथसिद्ध हे सगळ्या भारतभर फिरले आहे त्या अर्थाने नाथसंप्रदाय हिंदुस्तान संप्रदाय आहे. ज्ञानेश्वरांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय होता, त्याचा प्रभाव होता, त्याचे संघटन होते. नामदेव हे त्याचे अध्वर्यु होते. वारकरी संप्रदायावर नाथसंप्रदायाचा आणि काश्मीरशैव संप्रदायाचा प्रभाव आहे. काश्मीरशैवांचा विचार हा बौद्ध व वेदांत यांचा समन्वय आहे आणि सूफी परंपरेवर काश्मीरशैव संप्रदायाचा प्रभाव आहे. तेव्हा तत्त्वज्ञानाचे भारतभर होणे ही एक वस्तुस्थिती होती. ही भारतीय स्तरावरची फेनामेनोन होती. हा भारताचा ॲकाडेमीक भूगोल आहे आणि या सगळ्या परंपरांमध्ये तुकोबांचे प्लेसमेंट हा चव्हाणांचा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. हे शिवधनुष्य होते, ते त्यांनी निश्चितपणे पेलले.

डॉ. सदानंद मोरे

समीक्षाग्रंथः अखईं तें जालें तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात
लेखकः समीर चव्हाण
आवृत्ती : पहिली | हार्ड बाऊंड |
खंड १: पृष्ठे ३५०, खंड २: पृष्ठे ६००
प्रकाशकः शुभानन चिंचकर, स्वयं प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठः भास्कर हांडे
छायाचित्रे: रुपेश शेवाळे
पुस्तकासाठी संपर्क – 97934 71751

अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात पुस्तकाच्या खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –
खंड १ – https://amzn.to/3JTjx1F
खंड २ – https://amzn.to/4bdHjBg


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading