उर्जेचा नियम आहेत. उर्जा एका रुपातून दुसऱ्या रुपामध्ये परावर्तीत होऊ शकते. म्हणजे तिचे वहन होऊ शकते. पण ती कधीही नष्ट होत नाही. म्हणजेच ती अमर आहे. सूर्यापासूनच ही उर्जा उत्पन्न झाली आहे. ती सर्व जीवामध्ये आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जयाचेनि उजियेडे । तारांगण उबडे ।
महातेज सुरवाडे । जेणे राहाटे ।। 927 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – ज्याच्या उजेडाने तारे ( ताऱ्यांचे समुदाय ) प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो.
सूर्यापासून आकाशगंगा अर्थात सृष्टीची निर्मिती झाली असल्याचे विज्ञानाने वारंवार स्पष्ट केले आहे. पण या पोकळीचा अंत किती आहे हे संशोधकांना सांगता आलेले नाही. अनंत अशा या ब्रह्मांडात काय काय आहे याचा शोध नेहमीच घेतला जातो. काही नव्या ग्रहांचा शोध लावण्यात आला आहे. वारंवार निरिक्षणातून धुमकेतू आदी ताऱ्यांचे शोधही लावले जातात. कोणत्या वेळी ते कोठे असतील याचाही वेध घेतला जातो. त्याचेही अचुक अनुमान लावले जाते. संशोधकांच्या या शोधाचे निश्चितच कौतुक करायला हवे.
सूर्यच सर्वाचे मुळ आहे यावर मात्र संशोधकांचे एकमत आहे. चंद्र, तारे प्रकाशमान आहेत. पण चंद्राला अन् ताऱ्यांना स्वतःचा असा प्रकाश नाही. पण ते प्रकाशमान आहेत. ते प्रकाशही देतात. रात्रीच्यावेळी चंद्राच्या प्रकाशाचा ताऱ्यांच्या प्रकाशाचा पृथ्वीवरील जीवसृष्टीला फायदा होतो. पण हे चंद्र-तारे सूर्यामुळेच प्रकाशमान आहेत. त्यांच्या तेजाचेमुळे हे सूर्यच आहे. पण सूर्याचे तेज कशामुळे आहे. ? तो कशामुळे तेजस्वी आहे. ?
सूर्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू शकत नाही. त्याच्या दाहकतेमुळे आपण तेथे पर्यंत पोहोचू शकत नाही. पण सूर्याच्या ठिकाणी कोणत्या घटना घडतात यावर संशोधकांनी शोध लावले आहेत. सूर्यांच्या ठिकाणी निर्माण होणारी सौर वादळे, पोकळी याचा शोध संशोधकांनी घेऊन त्याची गणितेही मांडली आहेत. त्याचा परिणाम पृथ्वीतलावर कसा होतो याचाही शोध घेण्यात आला आहे.
गुरुत्वीय शक्तीमुळे सूर्याभोवती हे सर्व ग्रह, तारे फिरत आहेत. सूर्या जवळच्या तेजातून, उर्जेतून या सर्वाची उत्पत्ती झाली आहे. या गुरुत्वीय शक्तीने सर्व सूर्याच्या कक्षेत नियंत्रित आहे. सर्व उर्जा सूर्यापासूनच उत्पन्न झाली आहे. उर्जेचा नियम आहेत. उर्जा एका रुपातून दुसऱ्या रुपामध्ये परावर्तीत होऊ शकते. म्हणजे तिचे वहन होऊ शकते. पण ती कधीही नष्ट होत नाही. म्हणजेच ती अमर आहे. सूर्यापासूनच ही उर्जा उत्पन्न झाली आहे. ती सर्व जीवामध्ये आहे.
आत्मा दिसत नाही पण त्याच्यामुळेच देहात चैतन्य, तेज आले आहे. देहामध्ये असणारी ही उर्जा सूर्याप्रमाणेच तेजस्वी आहे. देहातून हा आत्मा गेल्यानंतर देहाचे विघटन होते. देह नष्ट होतो. देहातील हे उर्जा, हे तेज, हे चैतन्य, हा आत्मा आपण अनुभवयाचा आहे. कारण त्याच्या अनुभूतीतूनच आपण सर्वज्ञ होऊ शकतो. त्याचे ज्ञान होणे यासाठीच गरजेचे आहे. यासाठी स्वः ची ओळख महत्त्वाची आहे. स्व च्या ओळखीतून सृष्टीच्या उत्पत्तीची ओळख होते. विश्वाचे ज्ञान होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.