‘ श्रीशब्द ‘ काव्यपुरस्कार जाहीर
प्रतिभा सराफ यांच्या उमलावे आतूनीच (ग्रंथाली,मुंबई) व लक्ष्मण महाडिक यांच्या स्त्रीकुसाच्या कविता (शब्दालय ,श्रीरामपूर) या पुस्तकांना पुरस्कार
नेज (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ) येथील स्फूर्ती साहित्य संघ व पोतदार परिवार यांचेमार्फत कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे ‘श्रीशब्द’ काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीतील पुरस्कारासाठी कवितासंग्रह कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, पुणे , सातारा, बेळगांव, कोकण, अमरावती, मुंबई, नाशिक, अकोला अशा अनेक ठिकाणाहून उत्स्फुर्तपणे कवितासंग्रह प्राप्त झाले.
कवी सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील समितीने पुरस्कारासाठी पुस्तकांची निवडकेली. यामध्ये प्रतिभा सराफ यांच्या उमलावे आतूनीच (ग्रंथाली,मुंबई) या पुस्तकास ₹ १००० व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, लक्ष्मण महाडिक यांच्या स्त्रीकुसाच्या कविता (शब्दालय ,श्रीरामपूर) या पुस्तकास ₹.१००० व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्कार जाहीर झाले.
याशिवाय विशेष पुरस्कार प्रत्येकी ₹ ५०० व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. राजश्री पाटील यांच्या ती अजूनही जळत आहे ( ग्रंथाली, मुंबई), रमजान मुल्ला यांच्या अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत (गोल्डन पेज, पुणे), डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या ऋतुरंग (भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर), प्रशांत केंदळ यांच्या गुलमोहराचं कुकू (चपराक प्रकाशन, पुणे ) या पुस्तकांचा समावेश आहे. लवकरच पुरस्कार वितरण समारंभपूर्वक करणार असल्याचे स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी सांगितले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.