September 24, 2023
Home » PM Narendra Modi

Tag : PM Narendra Modi

सत्ता संघर्ष

लोकमान्यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करू : पंतप्रधान मोदी

भाषणाची सुरुवात मराठीतून पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट आणि ‘मोदी’, ‘मोदी’चा जयघोष झाला. त्यांनी हात उंचावत उपस्थितांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी ‘आज लोकमान्यांची १०३...
काय चाललयं अवतीभवती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली...
काय चाललयं अवतीभवती

देशा बाहेर जाणारा पैसा रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

‘कृषी आणि सहकार’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्न मोदी यांनी केलेले संबोधन  गेल्या आठ-नऊ वर्षांप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला खूप जास्त महत्व देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थसंकल्पाच्या दुसर्‍या दिवशीची वृत्तपत्र तुम्ही बघितली, तर हेच दिसेल, की प्रत्येक अर्थसंकल्पाला गाव, गरीब आणि शेतकऱ्याचा अर्थसंकल्प असंच म्हटलं गेलं आहे. 2014 मध्ये कृषी क्षेत्राचा अर्थसंकल्प 25 हजार कोटी पेक्षाही कमी होता, आम्ही येण्या पूर्वी. आज देशाचा कृषी क्षेत्राचा अर्थसंकल्प वाढला असून, तो 1 लाख 25 हजार कोटी रुपयांहून जास्त झाला आहे. मित्रहो, स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ आपलं कृषी क्षेत्र टंचाईच्या सावटाखाली राहिलं. आपल्या अन्नसुरक्षेसाठी आपण जगावर अवलंबून होतो. पण आपल्या शेतकऱ्यांनी आपल्याला केवळ आत्मनिर्भरच बनवलं नाही, तर आज त्यांच्यामुळे आपण निर्यात करण्यासाठीही सक्षम झालो आहोत. आज भारत अनेक पद्धतींनी कृषी उत्पादनांची निर्यात करत आहे. आपण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत शेतकऱ्याचा प्रवेश सुकर केला आहे. पण आपल्याला ही गोष्टही लक्षात ठेवायला हवी, की आत्मनिर्भरता असो, की निर्यात असो, आपलं उदिष्ट केवळ तांदूळ, गहू इथवरच सीमित राहता कामा नये.  कृषी उत्पादनांच्या क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्यावर अर्थसंकल्पात भर उदाहरणार्थ, 2021-22 मध्ये डाळींच्या आयातीवर 17 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. पोषण- मूल्यवर्धित खाद्यपदार्थांच्या आयातीवर 25 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचप्रमाणे 2021-22 मध्ये खाद्यतेलाच्या आयातीवर दीड लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. केवळ एवढ्याच वस्तूंच्या आयातीवर सुमारे २ लाख कोटी रुपये खर्च झाले, याचा अर्थ इतका पैसा देशाबाहेर गेला. आपण या कृषी उत्पादनांच्या क्षेत्रातही आत्मनिर्भर बनलो, तर हाच पैसा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रांना पुढे नेण्यासाठी अर्थसंकल्पात निर्णय घेतले जात आहेत. आम्ही एमएसपी वाढवला, डाळींच्या उत्पादनाला चालना दिली, अन्न प्रक्रिया करणाऱ्या फूड पार्कची संख्या वाढवली. त्याच बरोबर, खाद्य तेलांच्या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने मिशन मोड मध्ये काम सुरु आहे. मित्रांनो, जोपर्यंत आपण कृषी क्षेत्राशी निगडीत आव्हानं दूर करत नाही, तोपर्यंत संपूर्ण विकासाचं उद्दिष्ट गाठता येणं शक्य नाही. आज भारतातली अनेक क्षेत्र झपाट्याने प्रगती करत आहेत, आपले ऊर्जामय युवा त्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. त्यांना कृषी क्षेत्राचं महत्व आणि या क्षेत्रात पुढे जाण्याचा शक्यता माहीत असूनही, या क्षेत्रातली त्यांची भागीदारी कमी आहे. खासगी नवोन्मेष आणि गुंतवणूक या क्षेत्रापासून अजूनही दूर आहे. ही मोकळी जागा भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...
काय चाललयं अवतीभवती

अमृतकाळात भारताला आधुनिक विज्ञानाची सर्वात प्रगत प्रयोगशाळा बनवू – नरेंद्र मोदी

निरीक्षण हे विज्ञानाचे मूळ आहे, आणि  अशा निरीक्षणामुळेच शास्त्रज्ञ नमुन्यांचा अभ्यास करतात  आणि आवश्यक परिणामांवर पोहोचतात, असे सांगत पंतप्रधानांनी माहिती संकलित करणे  आणि परिणामांचे  विश्लेषण...
काय चाललयं अवतीभवती

योगाभ्यास, आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या अन् कसोट्यांवर यशस्वी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (96 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या शहाण्णव्या भागात संवाद साधत...
काय चाललयं अवतीभवती

फॉर्च्युन 500 यादीतील 400 हून अधिक कंपन्या कर्नाटकात – नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले. मागील सरकार वेगाला चैन मानत होते आणि मापन हा धोका मानत होते”,आमच्या सरकारने हा कल बदलला...
काय चाललयं अवतीभवती

भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह अन् संकल्पना

भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे  बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले. पंतप्रधानांनी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सूर्यमंदिराच्या मोढेराची सौरग्राम अशी नवी ओळख – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सूर्यमंदिराच्या मोढेराची सौरग्राम अशी नवी ओळख मोढेरा गावास प्रति तास दहा हजार युनिट विजेची आवश्यकता होती पण आता सौर ऊर्जा ग्राम प्रकल्पामुळे प्रति तास 1.50...
काय चाललयं अवतीभवती

चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण

एकता नगर, गुजरात इथे झालेल्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचे भाषण गुजरातमधील एकतानगरमध्ये झालेल्या पर्यावरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आपण...
काय चाललयं अवतीभवती

आठ वर्षात देशाच्या दूध उत्पादनात सुमारे 44 टक्के वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीजवळ ग्रेटर नोएडा इथे आंतरराष्ट्रीय डेयरी फेडरेशनच्या जागतिक दुग्धव्यवसाय परिषदेचे उदघाटन झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, पंतप्रधान म्हणाले, दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित...