April 16, 2024
12 Approval of rate of royalty in respect of mining of important and war minerals
Home » 12 महत्वपूर्ण आणि युद्धपयोगी खनिजांच्या खाणकाम संदर्भातील स्वामित्वशुल्क दरास मंजुरी
काय चाललयं अवतीभवती

12 महत्वपूर्ण आणि युद्धपयोगी खनिजांच्या खाणकाम संदर्भातील स्वामित्वशुल्क दरास मंजुरी

बेरिलियम, कॅडमियम, कोबाल्ट, गॅलियम, इंडियम, रेनिअम, सेलेनियम, टँटलम, टेल्युरियम, टायटॅनियम, टंगस्टन आणि व्हॅनेडियम या 12 महत्वपूर्ण आणि सामरिक खनिजांच्या खाणकामासाठी स्वामित्वशुल्क दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बेरिलियम, कॅडमियम, कोबाल्ट, गॅलियम, इंडियम, रेनिअम, सेलेनियम, टँटलम, टेल्युरियम, टायटॅनियम, टंगस्टन आणि व्हॅनेडियम या 12 महत्वपूर्ण आणि युद्धपयोगी खनिजांच्या संदर्भात स्वामित्वशुल्क दर निर्दिष्ट करण्यासाठी खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायदा, 1957 (‘एमएमडीआर कायदा’) मधील दुस-या अनुसूचीतील सुधारणेला मंजुरी दिली.

यामुळे  सर्व 24 महत्वाच्या आणि सामरिक  खनिजांसाठी स्वामित्वशुल्क दरांचे सुसूत्रीकरण  पूर्ण झाले आहे. हे  लक्षात घेतले पाहिजे की सरकारने 15 मार्च 2022 रोजी 4 महत्वाच्या खनिजांचा उदा., ग्लॉकोनाइट, पोटॅश, मॉलिब्डेनम आणि प्लॅटिनम गटाच्या खनिजांचा आणि 12 ऑक्टोबर 2023 रोजी लिथियम, निओबियम आणि दुर्मिळ मूलद्रव्ये अशा 3 खनिजांसाठी स्वामित्वशुल्क दर अधिसूचित केला होता.

अलीकडे, खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) सुधारणा कायदा, 2023, जो 17 ऑगस्ट, 2023 पासून लागू झाला आहे, त्या एमएमडीआर कायद्याच्या पहिल्या अनुसूचीच्या भाग ड मध्ये 24 महत्वाची आणि सामरिक  खनिजे सूचीबद्ध केली आहेत. या 24 खनिजांच्या खाण भाडेपट्टा आणि संमिश्र परवान्याचा केंद्र सरकारकडून लिलाव करण्यात येईल, अशी तरतूद दुरुस्तीमध्ये करण्यात आली आहे.

स्वामित्वशुक दराच्या तपशीलासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या मंजुरीमुळे केंद्र सरकारला देशात प्रथमच या 12 खनिजांच्या खाणींचा लिलाव करता येणार आहे. खनिजांवरील स्वामित्वशुल्क दर हा खाणींच्या लिलावात बोलीदारांसाठी महत्त्वाचा आर्थिक निर्णय आहे. तसेच, या खनिजांची सरासरी विक्री किंमत (एएसपी) मोजण्याची पद्धत देखील खाण मंत्रालयाने तयार केली आहे ज्यामुळे बोलीचे मापदंड निश्चित करणे शक्य होईल.

एमएमडीआर कायद्याची दुसरी अनुसूची विविध खनिजांसाठी स्वामित्वशुल्क दर प्रदान करते. दुस-या अनुसूचीतील घटक क्रमांक 55 मध्ये अशी तरतूद आहे की ज्या खनिजांचा स्वामित्वशुल्क दर त्यामध्ये विशेषतः प्रदान केलेला नाही अशा खनिजांसाठी स्वामित्वशुल्क दर सरासरी विक्री किंमतीच्या (एएसपी) 12% असेल. अशाप्रकारे, जर यांसाठी स्वामित्वशुल्क दर निर्धारित केला नसेल, तर त्यांचा पर्याप्त स्वामित्वशुल्क दर एएसपी च्या 12% असेल, जो इतर महत्वाच्या  खनिजांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. तसेच, या 12% स्वामित्वशुल्क दराची तुलना इतर खनिज उत्पादक देशांशी करता येत नाही. अशा प्रकारे, खालीलप्रमाणे वाजवी स्वामित्वशुल्क दर निर्दिष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे:

बेरिलियम, इंडियम, रेनियम, टेल्युरियम: उत्पादित खनिजांत असलेल्या संबंधित धातूवर आकारण्यायोग्य संबंधित धातूच्या एएसपी च्या 2%. कॅडमियम, कोबाल्ट, गॅलियम, सेलेनियम, टँटलम (कोलंबाईट-टँटलाइट व्यतिरिक्त इतर खनिजांपासून मिळवलेले), टायटॅनियम (किनाऱ्यावरील वाळूतील खनिजांव्यतिरिक्त इतर खनिजांपासून मिळवलेले):

(i) प्राथमिक-उत्पादित खनिजांत असलेल्या संबंधित धातूवर आकारण्यायोग्य संबंधित धातूच्या एएसपी च्या 4%.
(ii) उप-उत्पादन – उत्पादित खनिजामध्ये असलेल्या संबंधित उप-उत्पादन धातूवर आकारण्यायोग्य संबंधित धातूच्या एएसपीच्या 2%

टंगस्टन: टंगस्टन ट्रायऑक्साइड (WO3) च्या एएसपी च्या 3% मध्ये प्रति टन खनिज प्रमाणानुसार WO3 समाविष्ट आहे.

व्हॅनेडियम:

(i) प्राथमिक-व्हॅनेडियम पेंटॉक्साइडच्या एएसपी च्या 4% मध्ये यथायोग्य प्रमाण आधारावर प्रति टन खनिज V2O5 समाविष्ट आहे.
(ii) उप-उत्पादन- व्हॅनेडियम पेंटॉक्साईडच्या एएसपी च्या 2% मध्ये V2O5 प्रति टन खनिज प्रमाणानुसार आहे.

Related posts

एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन…

स्वाभिमानीतर्फे शिवाजी विद्यापीठात नांगरट साहित्य संमेलनाचे आयोजन

रासायनिक खताच्या दुष्परिणामावर ‘नॅनो युरिया’चा पर्याय

Leave a Comment