भारतीय शेतकऱ्यांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी कृषीकथा ब्लॉग साइटसह कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत बँकांच्या व्याज सवलतीच्या दाव्यांचा जलद निपटारा करण्यासाठी वेब पोर्टल चे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्लीः केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वेब पोर्टलचे अनावरण केले. या कार्यक्रमाला कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी देखील उपस्थित होते. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग (डीए अँड एफडब्ल्यू) आणि नाबार्ड यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) अंतर्गत दाखल केलेल्या बँकांच्या व्याज सवलतीच्या दाव्यांचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेला स्वयंचलित आणि वेगवान करण्यासाठी संयुक्तपणे वेब पोर्टल विकसित केले आहे. नाबार्डचे अध्यक्ष, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मोदी सरकार विविध उपाययोजना करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या संबोधनात सांगितले. ते म्हणाले की पीएम मोदींनी पिकांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी बोलीद्वारे 1 लाख कोटी रुपयांच्या निधीसह कृषी पायाभूत सुविधा निधी सुरू केला होता हे नमूद करताना ते म्हणाले की कर्जाच्या दाव्यांच्या नव्याने अनावरण झालेल्या स्वयंचलित प्रणालीमुळे दाव्यांचा वेळेवर म्हणजे एका दिवसात निपटारा होईल, अन्यथा मानवी पद्धतीने निपटाऱ्यासाठी महिने लागत होते. या निर्णयामुळे पारदर्शकता आणि भ्रष्ट पद्धतींना आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करणारे नवीन पोर्टल शेतकरी समुदायाला एकमेकांच्या अनुभवांचा लाभ घेण्यास सक्षम करेल हे उद्धृत करताना चौहान म्हणाले की असे अनेक शेतकरी आहेत जे स्वत: प्रयोग करत आहेत आणि त्यांच्या यशोगाथा सर्वांसमोर याव्या जेणेकरून इतरही त्यांचे अनुकरण करतील. आजपर्यंत कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत उभारलेल्या 72,000 कोटी रुपयांच्या निधीपैकी 67,871 प्रकल्पांसाठी 43,000 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, बँका व्याज सवलतीच्या दाव्यांचे जलद निपटारा अपेक्षित करू शकतात असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले.
स्वयंचलित प्रणाली पोर्टल मॅन्युअल प्रक्रियेतील संभाव्य मानवी त्रुटी टाळून अचूक पात्र व्याज सवलतीची गणना करण्यात मदत करेल आणि दाव्यांचा जलद निपटारा करण्यात मदत करेल. पोर्टलचा वापर बँका, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि नाबार्ड च्या केंद्रीय प्रकल्प व्यवस्थापन विभागाद्वारे (सीपीएमयु) केला जाईल. व्याज सवलतीचे दावे आणि पत हमी शुल्क दावे प्रक्रियेचे स्वयंचालन सरकारला अचूक व्याज सवलत जारी करण्यात मदत करेल, प्रक्रियेला लागणारा वेळ कमी करेल आणि त्या बदल्यात शेतकरी आणि कृषी उद्योजकांना वित्तीय सहाय्य पुरवून देशातील कृषी विकासासाठी असे आणखी प्रकल्प राबवण्यास प्रोत्साहन देईल अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारतीय शेतकऱ्यांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काम करणाऱ्या कृषी कथा या ब्लॉगसाईटचे अनावरण केले. देशभरातील शेतकऱ्यांचे अनुभव, संकल्पना आणि यशोगाथा सर्वांसमोर आणण्यासाठी ही ब्लॉगसाईट समर्पित आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.