September 25, 2023
Vharade bol Pratima Ingole Poem
Home » वर्हाडी बोल
मुक्त संवाद

वर्हाडी बोल

साधंसुधं लेनं जसं…
तसे माया वर्हाडीचे बोल
चाकोलीवानी उमटली
त्यात अंतरीची ओल!

माया वर्हाडीचा बोल
हाये कसा झोकदार
जरीच्या टोपीले बाई
जशी लावली झाल्लर!

माया वर्हाडीचे बोल
सोभ सोभले मुखात
जसे लालचुटूक दाने
हारी मांडले अनारात!

माया वर्हाडी बोलाले
नका करू हनहन
शिवबा वर्हाडीचा नातू
त्याची तुम्हा आम्हा आन !

प्रतिमा इंगोले. ९८५०११७९६९.

Related posts

भोगवटा : सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी अनुभव मांडणारा कथासंग्रह

वेदनेची गाथाः पाय आणि वाटा

खजुराहो मंदिराचे अवशेष आपल्याला काय सांगतात ?

Leave a Comment