हे शेतकऱ्यांनो जागे व्हा...
हे शेतकऱ्या
तुझा मुडदा पाडण्यासाठी
त्यांच एक मोठ जाळ कामाला लागलयं
हे शेतकऱ्या
तुझा मुडदा पाडण्यासाठी
त्यांच एक मोठ जाळ कामाला लागलयं
त्यांना तुला कर्जबाजारी करायचंय
आणि पुन्हा एकदा बळीला
मातीखाली गाडायचयं..
त्यांना तुला कर्जबाजारी करायचंय
आणि पुन्हा एकदा बळीला
मातीखाली गाडायचयं.
तुझी हिरवी शेतं नांगरून
ते तिथे बिल्डिंगही बांधतील
शिक्षणसंस्था उभारतील
कारखाने टाकतील
तुझी हिरवी शेंत नांगरून
ते तिथे बिल्डिंगही बांधतील
शिक्षणसंस्था उभारतील
कारखाने टाकतील
म्हसोबाला कापावे बोकड
तसे जीवंत माणसे कापतील
म्हसोबाला कापावे बोकड
तसे जीवंत माणसे कापतील
आमदार, खासदार, बाजारसमित्या
व्यापारी, मापारी
आमदार, खासदार, बाजारसमित्या
व्यापारी, मापारी
हे सगळे त्यांच्याच जाळ्याचे एक भाग आहे
तुझ्या रक्ताला चटावलेले शेतकऱ्या
हे तुझ्या घरातलेच वाघ आहे
तुझ्या रक्ताला चटावलेले शेतकऱ्या
हे तुझ्या घरातलेच वाघ आहे
अशी काळरात्र तुझ्या डोक्यावरती उभी
तू डोळ्यात तेल घालून जाग
कारण जागतिकीकरणामध्ये
माणूस झालाय स्वस्त
आणि माती झाली महाग
कारण जागतिकीकरणामध्ये
माणूस झालाय स्वस्त
आणि माती झाली महाग
आणि माती झाली महाग
- संदीप जगताप
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.