आठवडा चक्रीवादळाचा व संमिश्र वातावरणाचा
हवामान अंदाज – माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ, आयएमडी, पुणे
Meteorologist (Retd.), IMD Pune.
शुक्रवार १७ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव, अमरावती. भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यात किमान तापमानात काहीश्या घसरणीची व हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता ही कायम आहे. त्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे रविवार १९ नोव्हेंबरला उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात पुन्हा येऊ घातलेले नवीन पश्चिमी झंजावाताच्या परिणामातून पडणाऱ्या पाऊस व बर्फबारीमुळे महाराष्ट्रत त्यानंतरच्या कालावधीत अधिक थंडी जाणवण्यासही त्याची मदत होईल, अशी शक्यता आहे
आज बंगालच्या उपसागरात सध्या अस्तित्वात असलेले अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे उद्या शुक्रवारी ( १७ नोव्हेंबरला )चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असुन त्यानंतरच त्याचे नामकरण होवून परवा शनिवारी (१८ नोव्हेंबरला) सकाळी बांगलादेश किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता जाणवते.
ह्या सर्व व इतर पूरक वातावरणीय घडामोडीतून शनिवार (ता. १९ ) ते बुधवार (ता. २३ नोव्हेंबर) च्या पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली ह्या जिल्ह्यात वातावरण काहीसे ढगाळलेले राहून कमाल व किमान तापमानात काहींशी वाढ होवून वातावरणात ऊबदारपणा जाणवेल, अशी शक्यता आहे.
हे सर्व असले तरी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाब क्षेत्र अथवा चक्रीय वादळ निर्मिती शक्यतेतून नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही, असे वाटते.
एल-निनो सध्या मध्यम ते उच्चं तीव्रतेत असला तरी धन ‘ आयओडी ‘ व भारत महासागरीय वि. वृत्त परीक्षेत्रात एकपेक्षा अधिक आम्प्लिटुडने कार्यरत असलेला ‘ एमजेओ ‘ मुळे बंगालच्या उपसागरातील चक्रिवादळ व तामिळनाडू, केरळातील ईशान्य हिवाळी मान्सूनच्या गतिविधितेला चालना मिळत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.