अवकाळीचे वातावरण अजुन ३ दिवस
खान्देश, मराठवाडा व विदर्भातील एकूण २२ जिल्ह्यात ( विशेषतः जळगांव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, वर्धा ह्या जिल्ह्यात) पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार ते शनिवार ( ता.११ ते १३ एप्रिलपर्यंत ) मध्यम अवकाळी ( वादळी वारा, विजासह गारपीट) पावसाची शक्यता जाणवते
मध्य महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असु शकते. मुंबईसह कोकणात मात्र वातावरण कोरडे राहणार असुन दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दिडअशांने अधिक जाणवेल. रविवार ( दि.१४ एप्रिल पासून )अवकाळीची तीव्रता काहीशी कमी होईल.
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.