December 3, 2024
Weather Forecast Cloudy chance of moderate rain
Home » Weather Forecast : ढगाळ वातावरण, मध्यम पावसाची शक्यता
काय चाललयं अवतीभवती

Weather Forecast : ढगाळ वातावरण, मध्यम पावसाची शक्यता

सोमवार दि.२० नोव्हेंबर २०२३

कार्तिक एकादशी ते कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा (२३ ते २६ नोव्हेंबर)दरम्यान अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील  मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण व मर्यादित क्षेत्रात रब्बीतील ज्वारी हरभरा पिकांना वरदान ठरु शकणाऱ्या मध्यम पावसाची शक्यता जाणवते. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचीच शक्यता अधिक जाणवते व त्यामुळे तेथे थंडी कमी होईल.

आजपासुन पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (पाच ते सहा डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता असुन बांगला देशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्राला त्याचा धोकाही नाही, आणि त्यापासून पाऊस होण्याचाही फायदा नाही. असे वाटते.

सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. तसेच एमजेओ सध्या फेज २ मध्ये असुन तो माघारी फिरून ६ मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर मधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली आहे.

दरवर्षी जशी थंडी असते तशीच थंडी उर्वरित  नोव्हेंबर महिन्यात असेल. म्हणजेच थंडी असणार आहे. म्हणजेच ३० नोव्हेंबरपर्यंत १४ ते १६ डिग्री दरम्यान किमान तापमान असु शकते. ह्याचाच अर्थ थंडीचे अस्तित्व नकारात्मकतेकडे नाही, हे समजून घ्यावे. तरीही शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवेल. असे वाटते. खान्देशात थंडीचे प्रमाण अधिक असेल.

वातावरणीय बदल हा बंगालच्या उपसागरातून १५ अंश अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून  येणाऱ्या व तामिळनाडू, केरळ राज्य ओलांडून पश्चिमकडे वाहणाऱ्या मजबूत ‘ पुर्वी वारा झोता ‘ तून वाहणारा हिवाळी मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्रतही जाणवेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading