ऑफिस, कॉलेज, ट्रीप ला जाणारे लोक हे तर चहाच्या आड्यावर जाणारे पर्मनंट मेंबर्स असतात. जणू काही एखाद्या चहा वाल्या कडे जणू त्यांची मेंबरशिप असते आणि दुधाच्या रतीबा सारख ते नित्य नियमान हजेरी लावतात.
आर्चिका बापट
साधारणपणे सगळ्यांकडेच सकाळच्या प्रहरी वाफाळलेल्या चहा ने दिवसाची सुरवात होते. चहा करताना त्यात थोडासा तिखटपणा आणायला खलबत्यात कुटलेले आले, अगदी ऐच्छिक पणे टाकलेला वेलदोडा पाण्यात उकळायला लागल्यावर वाफेबरोबर त्याचा पसरणारा दरवळ आहा! मन अगदी प्रसन्न करतो. तयार झालेला गरमागरम चहा त्याचा निवांत पेपर वाचत घेतलेला आस्वाद , घरोघरी हेच चित्र असत.
कोणाला कप बशीतून भुरके मारत चहा प्यायला आवडतो तर कोणाला बाहेर टपरी वर मिळणारा कटिंग चहा ग्लास मधे प्यायला, तर काहींना निवांत टेरेस वर बसून मग मधे प्यायला, चहा तोच असतो पण पिण्याच्या तऱ्हा भिन्न असतात पण त्यातून मिळणार समाधान सारखच असत. घरा घरात चहा ची तल्लफ ही किती वेळा, कोणाला कधी येईल सांगता येत नाही. काम करताना दोन तीन पाच वेळा चहा पिण हे तर अगदी कॉमन आहे. हे झाले घरातले चहाचे सेवन .
ऑफिस, कॉलेज, ट्रीप ला जाणारे लोक हे तर चहाच्या आड्यावर जाणारे पर्मनंट मेंबर्स असतात. जणू काही एखाद्या चहा वाल्या कडे जणू त्यांची मेंबरशिप असते आणि दुधाच्या रतीबा सारख ते नित्य नियमान हजेरी लावतात.
अमृततुल्य हे पूर्वी पासून प्रचलित सर्व सामान्यांच्या आवडीच ठिकाण, अमृततुल्य चा special चहा म्हणजे पर्वणीच. कॉलेज मधील मुल मुली, ऑफिस मधून किंवा कामाच्या ठिकाणाहून ठराविक वेळेला झुंडीनी बाहेर , चहाची तल्लफ आली म्हणून बाहेर पडणारे लोक. टपरी वर मिळणारा कटिंग चहा , क्रीम रोल बरोबर हासत खिदळत खाणारे विद्यार्थी प्रत्येकाची चहा ची वेगळीच गोष्ट असते. लहान मुले कधी कधी मोठी माणसे सुद्धा glucose ची बिस्किटे चहात बुडवून बशीत त्याचा पूर्ण लगदा होईपर्यंत ठेऊन खातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच तेज, आनंद काही वेगळाच असतो , स्वर्ग सुख मिळाल्यासारखं वाटत. हल्ली तर वेगवेगळ्या चहाची तल्लफ लोकांना लागलेली दिसते गुळाचा चहा, कुल्लड चहा वगैरे वगैरे.
पावसाळ्यात मित्र, मैत्रिणीनं बरोबर चिंब भिजल्यावर कुठेतरी कडेला असलेल्या टपरीवर गरमागरम कणसाबरोबर सहज मारलेला २/३ कटिंग चहा, धुक्यात एकसंध झालेली वाफ आणि हळुवार स्पर्श करत झालेला पावसाचा शिडकाव किती रमणीय आहे.
खरच चहाच्या एका घोटा सोबत रिजवत जावा दिवस
मित्र मैत्रीणीं बरोबर चहा असतो सोबत
प्रत्येक घोट त्याचा जणू स्पर्श अमृताचा
या एकदा चहाला निवांत गप्पा मारायला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
