July 20, 2024
Netra Palkar Apte article on Mrug Insect
Home » अरे बापरे ! हा किडा कोणता ? जाणून घ्या…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अरे बापरे ! हा किडा कोणता ? जाणून घ्या…

ग्रामीण भागात मृगनक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात ! या नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा किडा बघायला मिळत असल्यामुळे याला मृग नक्षत्राचा किडा किंवा मृगाचा किडा असंदेखील म्हटलं जातं. हा किडा दिसला की पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातील लोकांची आहे. त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद-कुंकू वाहतात त्याची पूजा करतात. हा किडा जसा ग्रामीण भागासाठी आकर्षणाचा विषय आहे, तसंच शहरी भागात देखील या किड्याने प्रचंड आकर्षण निर्माण केलेला आहे.

Netra Palkar Apte article on Mrug Insect
Netra Palkar Apte article on Mrug Insect

या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. याला संस्कृत मध्ये बिर बाहुती, उर्दूत राणी किडा, तेलगू अरुद्रा तर मराठीत काही ठिकाणी गोसावी किडा असेदेखील म्हटले जात. या किड्यांचं आयुष्यमान तसं खूप कमी कालावधीचंच असतं. साधारणपणे दोन ते तीन महिन्यानंतर हे किडे दिसत नाहीत. या किड्यांची मादी ओल्या मातीत अंडी देते आणि साधारणपणे दोन महिन्यांनंतर या अंड्यांमधून लहानलहान किडे बाहेर पडतात.

या किड्यांना साधारणपणे आठ पाय असतात. परंतु जोपर्यंत हे किडे तरुण होत नाहीत तोपर्यंत यांना सहा पायच असतात. पुढे तरुण झाल्यानंतर त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांसोबत हे जास्तीचे दोन पाय देखील दिसू लागतात. आधीच सांगितल्याप्रमाणे या किड्यांचं आयुष्यमान फारच कमी असते. त्यामुळे पावसाळ्यानंतर हे किडे आपल्याला बघायला देखील मिळत नाहीत.

कदाचित पुढच्या पिढ्यांना हे रेशमी लाल किडे बघायला देखील मिळणार नाहीत. याला कारण आपणच मानवच आहोत. पॅरॅलेसीस आणि लैंगिक समस्येवर औषध म्हणून हे किडे वापरले जातात. तसेही अतिरिक्त रसायनांच्या वापरामुळे १९९० ते २०२० या दरम्यान किड्यांच्या २५टक्के प्रजाती पृथ्वीवरून दिसेनाशा झाल्या आहेत. Survival of the fittest हा निसर्गनियम आहे आणि मनुष्यप्राणी लोभी आहे. त्यामुळं आणखी एक प्रजात हळूहळू दुर्मिळ होतेय हे मात्र खरं.

नेत्रा पालकर – आपटे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी…

स्वधर्माच्या विश्वरूपातून भक्तीच्या बीजाची पेरणी

Neettu Talks : कोणते पदार्थ खायचे टाळायला हवेत ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading