नाटकातील एखाद्या
नटाचे निधन झाले,
तर त्याचा तो रोल,
त्याच्या बायकोला देतात का सहानुभूती म्हणून …??
की
एखादा पायलट मेल्यावर त्याच्या बायकोला पायलट करतात ??
की
एखादा नाटककार मेल्यावर त्याच्या बायकोला पुढची नाटकं लिहायला देतात ??
की
एखाद्या डॉक्टरच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला दवाखान्यात
किंवा
हॉस्पिटलमध्ये त्याची जागा मिळते ..?
पोलीस किंवा सैनिक
यांच्याजागी त्यांच्या
बायका त्यांच्या पोस्टवर
येतात का ?
की
गीतकारांच्या बायका त्यांच्या निधनानंतर,
गाणी लिहायला लागतात ??
शिक्षक,
आर्किटेक्ट,
शास्त्रज्ञ,
खेळाडू,
प्लंबर,
इलेक्ट्रिशिअन,
गायक,
संपादक,
नर्तक यांच्या
बाबतीत काय होते ??
वाचक मेल्यानंतर त्याची पत्नी वाचक होते का ?
की
प्रूफरिडरच्या पत्नीला
प्रूफरिडिंगची कामं देतात
सहानुभूती म्हणून ..??
एखादा सहानुभूती देणारा वारला
तर
त्याच्या पश्चात त्याची
पत्नी सहानुभूती द्यायला
बसते का ?
ध्यानाकर्षण..!
आपण लोकशाहीत
ही घराणेशाही
रुजवण्यासाठी कळत नकळत हातभार लावतो.
कोणाचा मृत्यू झाला की सहानुभूतीपूर्वक
मुलाला
किंवा पत्नीला तिकीट..!!
जिंकण्याची क्षमता म्हणून
नेत्याच्या परिवारातील
सदस्यला तिकीट..!
हे सार अखेर
लोकशाहीतील
राजेशाहीलाच
खतपाणी
घालणार ठरतं.
जनता बिचारी
मुकी
कोणी कशी ही हाका..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.