July 27, 2024
Aloe Vera Mediational Plantation satish Kanwade article
Home » कोरफड (ओळख औषधी वनस्पतीची)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोरफड (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  कोरफड या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव- कोरफड

वनस्पतीचे वर्णन

लीलीयासी या कुलातील भूवार्षिक झुडुपवर्गीय वनस्पती असून कमी पाण्यात वाढणारी वनस्पती पानेही जाड दातेरी कडांची, मांसल पाणी गराचे स्वरूपात साठवून ठेवणारी, लांबट व खोडाच्या भोवती गोलाकार वाढणारी, खोडाच्या बुंध्याला नवीन पिलावळ (सकर्स) तयार होतात. यापासून नवीन लागवड करता येते. साधारणपणे डिसेंबर-फेब्रुवारीपर्यंत या झाडाला बी असते व लागवड कंदाने करतात.

औषधी उपयोग

अनेक रासायनिक द्रव्ये अलोईन बाब्रोलीन, गेलिक अॅसिड, उडणशील तेले असतात. ऑक्सिडेज, कॅटालेज, अमायलेज ही महत्वाची एन्झामाईन्स आहे. याशिवाय आई सोबारबेलाईन, बिता बार्बेलोईन, अन्योसीस, ग्लायकोसाईडस, रेसिन्स व ग्म्स इमोडीन क्रायसोपेनिक, अॅसिड, फ्री अमिनो अॅसिड, डी  ग्लुकोज व डी मेनोज कोलेस्टेरॉल बिता सीटोस्टीरोल, लपेओल  ही रसायने आहेत. पानांचा रस अपचन, मोठ्या आतड्याची शिथिलता, अर्ची, अग्नीमांद्य, कुप्च्न, कब्ज व आमशाव्र फार उपयोगी पडते. अन्नरस शुद्ध होतो, शुद्ध रक्त उत्पन्न होते. फिकट रंग मोठे कब्ज याला कोरफडी सारखी दुसरे औषध नाही. लठ्ठपणा कमी आणि  जखमा भरून येण्यासाठी लागणारी औषधी बनविली जातात. पानांचं रस व गोडेतेल उकळून केसाला लावल्यास शांत झोप लागते. कुमारीपासून निरनिराळ्या प्रकारचे कल्प तयार करतात. त्यासाठी एल्वा अरब स्थानातून आणावा लागतो. आपल्या देशातील कुमारीत जास्त एलवा निघतो.

हवामान व जमीन

कोरफडीच्या लागवडीसाठी उष्ण व कोरड्या हवामानाची गरज आहे. कमी पावसाच्या प्रदेशास जिरायत पिक म्हणून याची लागवड होते. विशेषतः समुद्र किनाऱ्याच्या वाळूत ही झाड जोरदार येतात. रेताड व हलक्या जमिनीत हे पिक चांगल्या प्रकारे येते. जमीन ही वालुकामय व चांगल्या निचऱ्याची असावी.

लागवड

भारतामध्ये विविध प्रकारच्या प्रजाती विकसित केलेल्या आहेत. हेक्टरी २० ते २५ गाड्या शेणखत टाकून उतार जमिनीमध्ये ५० सेमी बाय २ मीटर अंतरावर चर काढूण किंवा ३० बाय ३० बाय ३० सेमी खड्डा करून ६० बाय ६० सेमी अंतरावर लागवड करावी.

काढणी

चांगली काळजी घेतल्याने लागवडीपासून एक वर्षाच्या काळामध्ये पाने काढता येतात. पाने काढताना खोडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पिवळसर झाली किंवा परिपक्व झाली अशा पानांची कापणी करावी. अशा पानांपासून जेल, काळाबोळ, रस पावडरीचे उत्पादन करावे.

उत्पन्न

साधारणपणे हेक्टरी १५/२० टना पर्यंत उत्पादन होते. दूरवर वाहतूक करणे परवडणारे नाही. त्यामुळे जागेवरच प्रक्रिया करणे योग्य. कोरफड जेल सध्या २००/२५० रुपये. काळाबोळा ७०/१०० प्रतिकिलो आणि पावडर ६ ते ८००० प्रतिकिलो दराने विकली जातात.

कोरफड प्रक्रिया उद्योग

कोरफड प्रक्रियेमध्ये कोरफड रस काढणे, जेल काढणे, कोरफडीच्या वड्या पाडणे, अएलोलीन काढणे, काळाबोळ तयार करणे, कोरफड तेल तयार करणे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शब्द हीसुद्धा एक ठिणगीच

अहंकारावर नम्रता हाच उतारा

ज्ञानाची पेरणी केल्यास पीकही ज्ञानाचेच उगवणार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading