October 4, 2023
Home » घरातच तयार करा हेअर पॅक…( व्हिडीओ)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घरातच तयार करा हेअर पॅक…( व्हिडीओ)

घरच्या घरी हेअर पॅक करता येऊ शकतो. कसा करायचा हेअर पॅक जाणून घ्या प्रोफेशनल आर्टीस्ट स्मिता पाटील यांच्याकडून….

तुमच्या बागेत लावलेली ब्राम्हीची पाने घ्या. कडीपत्ता घ्या. दोन्हीही प्रत्येकी एक मुठभर घ्या. यातील एखादी वस्तू नसेल तरीही चालते. त्यानंतर गवला, कछोला, नागरमोथा आणि आवळा पावडर घ्या. यातील एखादी पावडर तुम्हाला मिळाली नाही तरी चालेल. नुसती आवळा पावडर असेल तरीही चालते. हे सर्व अंदाजेच घ्यायचे आहे.

त्यानंतर बागेत लावलेली कोरफडीची पाने घ्या. ती पाने कापून त्यातील गाभा काढून घ्या. याचबरोबर दही, ऑलिव्ह ऑईल, मध घ्या. दही सोडून सर्व मिक्सरमध्ये सर्व मिक्स करायचे आहे. दही आपणास सर्वात शेवटी मिक्स करायचे आहे. मध आणि ऑलिव्ह ऑईल एखादाच चमच्या घ्यायचा आहे.

दही सोडून सर्व वस्तू एकत्र मिक्सरच्या भांड्यात घ्या. पिकलेली पपई किंवा केळ असेल ते सुद्धा यामध्ये मिक्स केली तरी चालेल. या सर्वाची मिक्समधून पातळ पेस्ट तयार करा.  त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात शेवटी  दोनचमचे दही मिक्स करायचे आहे.  हा झाला तयार हेअर पॅक. ही पेस्ट अर्धा तास केसांना लावून ठेवायचा आहे. त्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. 

Related posts

देशा बाहेर जाणारा पैसा रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

स्वलोटेल कुळातील फुलपाखरे

अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. शरद गडाख यांची नियुक्ती

Leave a Comment