December 2, 2023
Anxiety about childrens studies solution by Sadashiv Panchal
Home » मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय का ?
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय का ?

बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीतही अमुलाग्र बदल होताना पाहायला मिळत आहे. शिक्षणाच्या पद्धती बरोबरच संस्काराचे धडेही देण्याची गरज आहे. पण तरीही त्याचा मुलांवर परिणाम होताना दिसत नाही. अशाने पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय आहे. मुलांना मोबाईल, टिव्हीची सवय लागल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी काय करायला हवे हे सांगणारा हा शिक्षण सल्लागार सदाशिव बाळकृष्ण पांचाळ याचा हा सल्ला…

मोबाईल – 9923590942

मुलांच्या अभ्यासाची चिंता अनेक पालकांना सतावत आहे. मुलं मोबाईल मध्ये अडकली आहेत. त्यामुळे पुढे कसे होणार ? असा यक्ष प्रश्न पालकांसमोर उभा राहीला आहे. मुलांचा अभ्यास चांगला व्हावा, असे वाटतंय, तर …मुलांबरोबरोबर सर्वांनी एकत्र जेवायला बसायचे. दुपारी शक्य नसल्यास रात्री बसावे. जेवताना आज दिवसभरात काय काय घडले, आपले अनुभव मुलांशी शेअर करायचे. आपसुकच मुलंही आपल्यासोबत शाळेत काय घडले ते सांगायला सुरूवात करतील. बोलण्याची सवय आपोआपच लागेल.

व्यक्त होण्यासाठी पालकांना वेगळे प्रयत्न करायची गरज लागणार नाही. मुलं बरोबर बोलतात की नाही, हेही आपल्याला कळेल. चुकीचा शब्द मुलांनी वापरल्यास न रागवता त्यांना त्या बद्दल समज द्यावी. जेवण झाल्यावरसुध्दा आपल्याला गप्पा करता येतील. यातून चांगल्या संस्कारांच्या गोष्टी, घडलेल्या घटना मुलांना सांगा, त्यांच्याकडून ऐकण्याचाही प्रयत्न करा.

आपल्या मुलांच्या अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. मुलांनाही पाहायला सांगा…

मुलांनी चांगलं बोलावं, असं वाटतं असल्यास त्यांना अवांतर वाचनाची सवय लावा. रोज वर्तमानपत्र वाचन करायला लावा. त्यासाठी आधी आपण वाचन करा. मुलं आपलं अनुकरण करत असतात. त्यामुळे ते तुम्ही कराल, तेच मुलं करतील. आई चपाती बनवायला गेली की मुलांना चपाती बनवावी असं वाटतं, त्याप्रमाणे करू दिल्यास त्या त्या गोष्टींची आवड निर्माण होते.

आवड निर्माण करण्यासाठी गोष्टींच्या पुस्तकांचा वापर करा. वाचनामुळे मुलांची बोलण्याची भाषा सुधारेल. व्याकरण आपसूकच समजू लागेल. लिहीतांना अडचणी कमी होतील. जेवढं वाचन केलं, ते पुन्हा तुम्हाला सांगायला सांगा. जेणेकरून मुलांनी काय वाचलंय, आणि ते त्यांच्या डोक्यात किती गेलं, हे समजेल. एकदा वाचलेले अनेकदा विचारून मुलांना बोलते करायचा प्रयत्न करा. एकाच विषयावर वारंवार चर्चा करा, तो विषय मुलांच्या धड्यातील असेल तर अभ्यासही होईल.

पालकांनी आपण आधी धडा वाचा. नंतर मुलांना वाचायला सांगा. मग त्यावर चर्चा करा. म्हणजे मुलं विसरणार नाहीत. वारंवार चर्चा केल्यास तो विषय पक्का डोक्यामध्ये (स्मरणशक्ती) बसेल. विसरायचं म्हटलं, तरी विसरणार नाहीत. मग कधीतरी घरातील सर्व मंडळी प्रेक्षक म्हणून मुलांना एखादी गोष्ट सांगायला सांगा. मुलांनी तोडक मोडक काहीही सांगायचा प्रयत्न जरी केला, तरी त्यांची वाहवा करा. त्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळेल. दुसऱ्यावेळी बोलायला तयार होतील. असा प्रयत्न झाल्यास मुलांमधील‌ चांगला वक्ता तुम्हाला दिसू लागेल.

बोलतो आहे, बोलण्यात सुधारणा आहे असे वाटत असल्यास आणि प्रोत्साहन मिळाल्यास मुलं तयार होतील. यामुळे मुलांना वाचनाची सवय लागेल, तसेच मुलं चांगल्या प्रकारे बोलू लागतील. अभ्यासही होईल. मुलांच्या चारही बाजू भक्कम होतील. मोबाईलची सवय नकळतपणे मोडेल. केवळ जेवण एकत्र घेतल्यास मुलांमध्ये असा बदल शक्य आहे. करून तर पाहा.

Related posts

बँकांच्या दिवाळखोरीतून धडा शिकण्याची गरज !

प्र (शासन)

संस्कृती संवर्धनासाठी अनुवाद संशोधन होणे गरजेचे – माया पंडित

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More