बा.. निसर्गा….
तू देतोस असं भरभरून
रिती करतोस तुझी ओंजळ
कोणी कितीही, कितीही वेळा मागितली तरी
करत नाहीस कोणाला तू दुजाभाव
आमचा प्रत्येक अणू-रेणू तुझाशिवाय अपूर्णच
तू असा बदलांचा सांगाती
आमच्या श्वासात सामावलेला
आमची स्पंदन सतत जागवत ठेवणारा
गाभाऱ्यातल्या निरांजनासारखा
कायम तेवत राहणारा
गोबल वार्मिंगच्या कोंडमाऱ्यात
तू गुदमरतोयस, घुसटमतोयस
पण पण तुझ्या घुसमटीत
करत नाहीस तू त्रागा
आम्हाला ठेवतोयस सदैव प्रफ्फुलीत
आंमच जगणं करतोस सुसह्य..
तुला आम्ही कुरतडतोय, ओरबडतोय
अगदी अघाश्यासारखं पुन्हा पुन्हा
खिळे टोकतोय तुझ्या माथ्यावर
इमल्या इमल्यांचे
तुझ्या उधरालाही आम्ही पोखरतोय
गोडवे गात विकासाचे
आम्ही तुझा देह चिरफाड करतोय
तरीही तू, इतका कसा रे निशब्ध
आम्ही निर्दयी, कठोर, बेगडी
तरी तू , इतका कसा रे संयमी, शांत
तू थकत नाहीस, थांबत नाहीस
कस जमत तुला हे सगळं
कधीकधी आमचा अतिरेक होतोय रे!
मग रूसतोस प्रलय, प्रकोप करत
रूद्रदावतार घेतोस
मिळेल ते कवेत घेत गडप करतोस
इथे ही करत नाहीस मग दुजाभाव
तुझ असणं म्हणजे, आमचं असणं
चराचराचं आस्तित्व तुझ्यात सामावलेलं
आम्ही संपू, आमच्या अनेक पिढ्या संपल्या, संपतील
तू संपत नाहीस, संपणारही नाहीस
युगानुगे तू असा सर्वदूर चिरकालीन
तू आहेस अनंत, अनादी, अकालनीय
कवी – सबना..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.