February 23, 2025
Chief Chemist Vishwajit Shinde of Datta Factory in Shirol ranks first in MD exam
Home » शिरोळच्या दत्त कारखान्याचे चिफ केमिस्ट विश्वजीत शिंदे एमडी परीक्षेत प्रथम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शिरोळच्या दत्त कारखान्याचे चिफ केमिस्ट विश्वजीत शिंदे एमडी परीक्षेत प्रथम

‘एमडी पॅनल’ परीक्षेचे अंतिम निकाल अखेर जाहीर

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी नवे ५० एमडींचे (कार्यकारी संचालक) पॅनल करण्यासाठी झालेल्या परीक्षेचे अंतिम निकाल अखेर जाहीर झाले असून, श्री दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्यातील चिफ केमिस्ट विश्वजित विजयसिंह शिंदे हे पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना १०० पैकी ६० गुण मिळाले.

साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे यांचे मार्गदर्शन आणि स्व. सा. रे. पाटील म्हणजे आमचे अप्पासाहेब यांचे कार्यसंस्कार यांमुळेच मी आज सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) पॅनलसाठी झालेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो.

विश्वजित विजयसिंह शिंदे

एकूण ७४ जणांच्या नावांची यादी उत्तीर्ण उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आली, असली तरी त्यातील ५० जणांनाच कार्यकारी संचालक तालिकेत (एमडी पॅनल) स्थान मिळणार आहे.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालक पदाच्या नियुक्तीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षा व मुलाखतीमधील गुणपत्रकानुसार पहिले ५० उमेदवार असे –

नाव आणि कंसात शंभरपैकी मिळालेले गुण

शिंदे विश्वजित विजयसिंह ( 60 )
किरण रामदास पाटील ( 55 )
दगडे अमोल विठ्ठल ( 54.17 )
राजेंद्र सुरगोंडा पाटील ( 52.17)
दरंदले हेमंत शरद ( 51.33 )
बहिर सदाशिव उत्तमराव ( 50.83 )
घोरपडे रणजित प्रतापराव ( 50 )
हणमंत विठ्ठल पाटील ( 50 )
कैलास कारभारी जरे ( 49 )
चरपळे सात्तापा बंडोपंत ( 48.33 )
संग्राम चिमाजी पाटील ( 48 )
कोले विजयकुमार सिद्धप्पा ( 48 )
यादव सुहास रघुनाथ ( 47.83 )
हणमंत नवनाथ करवार ( 47.83 )
स्वरूप दिलीप देशमुख ( 46.83)
सावंत संभाजी कृष्णा ( 46.67)
लोकरे गणपती गोपाल ( 46.33)
विजयसिंह दत्तात्रय शिर्के ( 46.33)
महेंद्र रंगनाथ घोळप ( 46.17 )
संतोष जयकुमार कुंभार ( 45.83)
गायकवाड दत्तात्रय रावण ( 45.5)
मारुती शिदू पाटील ( 44.33 )
सोमनाथ शिवाजी बोरनारे ( 44 )
ठोंबरे विठ्ठल शंकर ( 43.83 )
जाधव इंद्रजीत विजयसिंह (43.33)
संदे बशीर निजाम ( 43)
नवनाथ अर्जुन सपकाळ ( 43 )
झगडे गिरीश कुंडलिक ( 43 )
दत्तात्रय लक्ष्मण पतंगे ( 43 )
पाटील सचिन भगवान ( 42.17 )
गावंडे विजय नामदेवराव ( 42.17)
शिंदे नितीन जितोबा ( 42.17)
कदम रामानंद किशनराव ( 42)
सागर भिमराव पाटील ( 42 )
जगदाळे बापू नामदेव ( 41.5)
पाटील शिवाजी नानासाहेब ( 41 )
किरण माणिकराव शेलार (40.67 )
रामचंद्र अनुरथ समुद्रे ( 40.5 )
आहेर महेश अशोक ( 40.17 )
पाटील आनंदा शंकर ( 40.17 )
संदीप विश्वनाथ पाटील ( 40.17)
मगदूम सुहास दर्याप्पा ( 40 )
पाटील अमोल अशोक ( 39.83 )
पट्टणकुडे मोतीलाल उर्फ विद्यासागर महावीर ( 39.83 )
सचिन महादेव शिंदे ( 39.67 )
कानवटे चंद्रशेखर हणमंतराव ( 39.17)
कुलकर्णी प्रशांत श्रीकांत ( 39.17 )
करपे बाळू चंद्रभान ( 39 )
बाळासाहेब सदाशिव ( 38.83 )
कामदेव सत्यनारायण मुदिराज ( 38.83 )

परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुणांची अट होती. या परीक्षेला ७४ उमेदवार बसले आहेत. मात्र पॅनल ५० जणांचेच होणार आहे. पहिला उमेदवार ६० टक्क्यांचा, तर ५० वा उमेदवार ३८.८३ टक्क्यांचा आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल तयार करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाकडून शासन निर्णय 18 एप्रिल 2022 रोजी पारित केला होता. या शासन निर्णयानुसार सविस्तर परिपत्रक राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून 31मे 2022 रोजी प्रसिद्ध केले होते. वेगाने बदलणाऱ्या राज्यातील साखर उद्योगाच्या व्यवस्थापनाची धुरा सक्षम पणे पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक कार्यक्षम असणे गरजेचे आहे या संकल्पनेतून कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेत आमूलाग्र बदल करणेचा निर्णय तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला होता.

या निर्णयानुसार कार्यकारी संचालकांची परीक्षा प्रथमच पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यामध्ये घेणेचा निर्णय केला होता. पहिल्या टप्प्यातील चाळणी परीक्षा 5 एप्रिल 2024 रोजी, दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा 4 मे 2024 रोजी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मौखिक चाचणी परीक्षा 19 जुलै ते 22 जुलै दरम्यान वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान, पुणे येथे घेण्यात आली होती.

मौखिक चाचणी परीक्षा चालू असतानाच लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी निवड प्रक्रिया सदोष असल्याची तक्रार करत पुढे करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे 8 जुलै 2024 रोजी याचिका दाखल करून निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते.

या याचिकेवर सविस्तर प्राथमिक सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने 18 जुलै 2024 रोजी आदेश पारित करून मौखिक चाचणी परीक्षा घेणेस अनुमती दिली होती; तथापि लेखी परीक्षेचे उमेदवारांचे गुण बंद लिफाफ्यामध्ये उच्च न्यायालयात सादर करण्याचे व परीक्षेचे अंतिम निकाल प्रसिद्ध न करण्याचा आदेश साखर आयुक्त कार्यालय व वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान यांना दिले होते.

या याचिकेवरील अंतिम सुनावणी दि 20 जानेवारी 2025 रोजी न्यायमूर्ती संजय मेहरे व न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. सुनावणी दरम्यान निवड प्रक्रियेला आव्हान दिलेल्या अनेक याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे दाखले वादी व प्रतिवादी यांचेतर्फे कोर्टात सादर करून जोरदार युक्तिवाद झाला .

तब्बल पाच तास चाललेल्या सुनावणीत निवड प्रक्रियेस आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाकडून ७ फेब्रुवारी २०२५ रोजी फेटाळण्यात आल्याने कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेचे अंतिम निकाल दि. 10 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

न्यायप्रविष्ट कायदेशीर प्रक्रिया लवकर पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार, तत्कालीन साखर संचालक राजेश सुरवसे, सहसंचालक मंगेश तिटकारे, वैकुंठ मेहता प्रबंधन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयात महत्त्वाची भूमिका बजावली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading