September 13, 2024
Difference between Desi and foreign cow milk
Home » देशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक
विश्वाचे आर्त

देशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक

गोचिडाला जसे दुधाची गोडी माहीत नसते तसे आज मानवाचे झाले आहे. गोड, पवित्र सोडून गोचीडाप्रमाणे तो अशुद्ध रक्ताचेच शोषण करू इच्छित आहे. मानवाची बदललेली ही विचारसरणीच मानवास घातक ठरत आहे. योग्य काय अयोग्य काय याचा विचारच होत नाही. फक्त उत्पादन किती होते. नफा किती मिळतो याचाच विचार केला जात आहे. होणारे उत्पादन आरोग्यास उपयुक्त आहे का नाही याचा विचारच होत नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल – 9011087406

पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरुनि गोचिड। अशुद्ध काय नेघती ।।57 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ – अर्जुना असें पाहा कीं, दूध हें पवित्र असून शिवाय गोड आहे व तें जवळच सडांच्या कातडीच्या पदरापलीकडे आहे. परंतु गोचिड तें टाकून देऊन रक्तच पीत नाही काय ?

देशी गायीचे दूध आणि विदेशी गायींचे दूध यामध्ये मोठा फरक आहे. न्यूझीलंड आणि आफ्रिकेतील संशोधनानुसार विदेशी गोवंशाच्या दुधाने क्षयरोग, हृदयरोग यासारखे विकार होतात. युरोपीय गाईंच्या दुधात ए-1 बीटाकेसीन असते. त्याचे आतड्यांत पचन होऊन बीटा केझोमऑरफिन-7 हे पेप्टाइड तयार होते. हे पेप्टाइड रक्तात शोषले गेल्यास मधुमेह, हृदयरोग, स्वमग्नता आणि सिझोफेनियासारखे रोग माणसांना होतात. डॉ. कीथ वूडफोर्ड यांनी या बीटा केझोमॉरफिन-7 ला डेव्हिल इन द मिल्क असे म्हटले आहे. असे असेल तर दूध पवित्र आणि गोड कसे. हा उल्लेख युरोपियन गायींच्या दुधास लागू होत नाही.

विदेशात झालेल्या संशोधनानुसारच भारतीय देशी गायींचे दूध हे सुरक्षित दूध म्हटले गेले आहे. देशी गायींच्या दुधाची प्रत उत्कृष्ट आणि मानवी आहारास पोषक असल्याने त्याची तुलना संकरित गायीच्या दुधाशी होऊच शकत नाही. यासाठी भारतीय वंशाचा गायी किती महत्त्वाच्या आहेत याचा विचार करून देशी गायींचे संवर्धन करण्याचा विचार व्हायला हवा. सध्या भारतात गेली काही दशके विदेशी वळूचे वीर्य वापरून गोसंकर केला जात आहे. अशा संकरामुळेच भारतात क्षयप्रवण पशूंच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत आता नव्याने पाऊले उचलण्याची गरज आहे. देशी गायींच्या वंशाचे संवर्धन हे गरजेचे आहे.

भारतीय गाईचे दूध, गोमूत्र, दही, तूप आणि शेण हे औषधी गुणांमुळे उपयुक्त आहेत. गाईचे तूप आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. गोमूत्र कीडनाशक म्हणून वापरले जाते. देशी गायीच्या दुधात रोगप्रतिकारक क्षमता असते. परजीव प्रादुर्भावास हे दूध प्रतिबंध करते. पण भारतीयांनी दूध कमी मिळते या कारणास्तव देशी गायींची कत्तल केली. विदेशी गायींचे वंश वाढविले. वाढत्या महागाईत आता या गायींच्या संगोपनाचा खर्च परवडणारा नाही. असे म्हटले जाते. रोगच दुधाच्या उत्पादनापेक्षा आरोग्यास उपयुक्त उत्पादने घेणे कधीही चांगले नाही का ?

गोचिडाला जसे दुधाची गोडी माहीत नसते तसे आज मानवाचे झाले आहे. गोड, पवित्र सोडून गोचीडाप्रमाणे तो अशुद्ध रक्ताचेच शोषण करू इच्छित आहे. मानवाची बदललेली ही विचारसरणीच मानवास घातक ठरत आहे. योग्य काय अयोग्य काय याचा विचारच होत नाही. फक्त उत्पादन किती होते. नफा किती मिळतो याचाच विचार केला जात आहे. होणारे उत्पादन आरोग्यास उपयुक्त आहे का नाही याचा विचारच होत नाही. देशी गोवंश असणारे खिल्लार, डांगी, लाल कंधारी चोवीस तासात चार लिटर दूध देते. तर गवळाऊ आणि देवणी या गायी सहा लिटर दूध देतात. हे दूध पवित्र तर आहेच शिवाय शुद्धही आहे. तसेच संपूर्ण घराचे आरोग्य राखणारे आहे. देशी गायीचे गोमूत्र परिसर स्वच्छ ठेवते यामुळे घराचे आरोग्य उत्तम राहते. यासाठीच हवे देशी गायींचे संवर्धन.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कावड यात्रा, योगींचा अजेंडा

इस्लाम समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक

भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर पोस्टर स्पर्धा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading