June 20, 2024
Exports of agricultural and processed food items increased by 31 per cent
Home » शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ
काय चाललयं अवतीभवती

शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ

भारतातील शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांची निर्यात विद्यमान आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2022-23 च्या पहिल्या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 31टक्क्यांनी वाढून 7408 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली

गेली वर्षीचा कल कायम राखत, शेतमाल तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या निर्यातीत वर्ष 2021-22 मधील याच कालावधीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2022-23 च्या पहिल्या तीन महिन्यात (एप्रिल ते जून या कालावधीत) 31 टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली आहे.

व्यावसायिक गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालनालयाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, अपेडाच्या उत्पादनांची गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जून या काळात 5663 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची  एकंदर निर्यात झाली होती तर या वर्षी त्याच कालावधीत 7408 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची  एकंदर निर्यात झाली आहे. एप्रिल ते जून 2022-23 या काळासाठी 5890 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील अपेडा म्हणजेच कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातून 31 टक्क्यांचे एकंदर निर्यातीचे उद्दिष्ट गाठण्यात मदत झाली आहे.

वर्ष 2022-23 मध्ये शेतमाल तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या निर्यातीसाठी अपेडाने 23.56 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. व्यावसायिक गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालनालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, एप्रिल ते जून2022-23 या काळात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ताजी फळे आणि भाज्या यांच्या निर्यातीत 4 टक्के तर प्रक्रियायुक्त फळे आणि भाज्या यांच्या निर्यातीत 59.71 टक्के इतकी भरीव वाढ नोंदविण्यात आली.

तसेच, तृणधान्यांसारखी प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या इतर वस्तू यांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच काळातील निर्यातीच्या तुलनेत 37.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एप्रिल ते जून 2021 या काळात, 394 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किंमतीची ताजी फळे आणि भाजीपाला यांची निर्यात झाली होती तर विद्यमान आर्थिक वर्षातील त्याच काळात ही निर्यात 409 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 490 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीची प्रक्रियायुक्त फळे व भाजीपाला यांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 307 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची प्रक्रियायुक्त फळे व भाजीपाला यांची निर्यात करण्यात आली होती.

2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत बासमती तांदळाच्या निर्यातीत 25.54 टक्के वाढ झाली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीत 922 दशलक्ष डॉलर (एप्रिल-जून 2021) वरून 1157 दशलक्ष डॉलर(एप्रिल-जून 2022) एवढी वाढ झाली आहे.तर बासमती वगळता इतर तांदळाच्या उत्पादनात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत  5  टक्के वाढ नोंदवली गेली आहे.  बासमती वगळता इतर तांदळाची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत 1566 दशलक्ष डॉलर एवढी झाली आहे, जी मागील वर्षाच्या याच तिमाहीत 1491 दशलक्ष डॉलर एवढी होती.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत 9.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर इतर धान्यांच्या निर्यातीत 29 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.  एकट्या दुग्धजन्य उत्पादनांनी 67.15 टक्के वाढ नोंदवल्याचे दिसून येते. कारण या उत्पादनांची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत 191  दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच तिमाहीत 114 दशलक्ष डॉलर्स एवढी होती.

इतर धान्यांची निर्यात एप्रिल-जून 2021 मध्ये  237 दशलक्ष डॉलर्स  वरून एप्रिल-जून 2022 मध्ये 306 दशलक्ष डॉलर्स एवढी झाली आणि पशुजन्य उत्पादनांची निर्यात एप्रिल-जून 2021 मध्ये  1022 दशलक्ष डॉलर्सवरून एप्रिल-जून 2022 मध्ये  1120 दशलक्ष डॉलर्स इतकी वाढली असल्याचे दिसते.

कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादने निर्यात प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू म्हणाले की “देशातील दुर्लभ उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आम्ही कृषी उत्पादने मूल्य साखळीतील विविध भागधारकांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करतो .”

वाणिज्यिक माहिती आणि सांख्यिकी महानिदेशालयच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये देशाच्या कृषी उत्पादनांची निर्यात 19.92 टक्क्यांनी वाढून तब्बल 50.21 अब्ज डॉलर्स झाली आहे.  2020-21 मध्ये गाठलेल्या  41.87 अब्जच्या 17.66 टक्क्यांहून अधिक वाढीचा दर लक्षणीय आहे.उच्च मालवाहतुकीचे दर आणि कंटेनर टंचाई अशी  दळणवळणाशी निगडित अभूतपूर्व आव्हाने समोर असतानाही ही वाढ झाली हे कौतुकास्पद आहे.

India’s Export Comparative Statement: APEDA Products
Product HeadApril-June,2021April-June,2022% Change (April-June,2022)
USD Million
Fruits & Vegetables3944093.74
Cereal preparations & Miscellaneous processed items830114337.6
Meat, dairy & poultry products102211209.5
Basmati Rice922115725.5
Non Basmati Rice149115665
Miscellaneous products1004201350
Total5663740830.81

Source: DGCIS Principal commodities data April-June, 2022) (Provisional data)

India’s Export Comparative Statement: APEDA Products
Product HeadApril-June,2021April – June (2022)% Change (April-June,2022)
Unit: USD Million
Floriculture & seeds54587.61
Fruits & vegetables3944093.74
Processed fruits &vegetable30749059.71
Livestock products102211209.50
Other processed foods830114337.66
Cereals2941410339.52
Cashew11485-25.42
Total5663740830.81
Source: DGCIS Principal commodities data April-June, 2022) (Provisional data)

Related posts

लम्पी स्किन आजार: प्रसार व नियंत्रण

अरे बापरे ! हा किडा कोणता ? जाणून घ्या…

‘वचन’ दाता गेला…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406