ट्रेकिंगमुळे आपण खूप गोष्टी शिकत जातो, ट्रेकिंगला जाताना काय बरोबर घ्यायचे, स्वतःची कशी काळजी घ्यायची अश्या सगळ्या गोष्टी या ट्रेकर्सच्या अनुभवातून वाचायला मिळतील. त्याचबरोबर गडकोटाचे व्यवस्थापन, गिर्यारोहणातल्या करिअर संधी, वेगळ्या वाटेवरचे किल्ले, सहयाद्रीच्या ट्रेकपेक्षा हिमालय ट्रेक कसे वेगळे आहेत, हिमालय ट्रेकची तयारी कशी जास्त करावी लागते. अश्या वेगवेगळ्या ३० लेखांनी दुर्गाच्या देशातून हा दिवाळी अंक सजलेला आहे.
प्राची गद्रे
भारत हा उंच डोंगर रांगा पर्वत शिखरे नद्या बर्फाळ प्रदेश वाळवंटी प्रदेश अशा विविध भौगोलिक परिस्थितीने समृद्ध देश आहे. भारतात ट्रेकिंगसाठी अनेक सर्वोत्तम ठिकाणं आहेत. ट्रेकिंगला जाणं हा रोमांचक अनुभव असतो. प्रवास, ट्रेकिंग ही अशी गोष्ट आहे की तुम्हांला नवीन काहीतरी शिकवते आणि जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देऊन जाते.
अशाच गडकोट, गिर्यारोहण, भटकंती, अनवट वाटा अश्या सगळ्या गोष्टींनी सजलेला ‘ दुर्गाच्या देशातून’ हा ट्रेकिंगचा पहिला दिवाळी अंक. या दुर्गाच्या देशातून या दिवाळी अंकाचे हे १० वे वर्ष आणि या निमित्ताने हा महिला विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. संदीप तापकीर आणि योगेश काळजे ह्यांनी दरवर्षी प्रमाणे नवीन नवीन दुर्ग प्रेमींना लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. किल्ल्यांची माहिती घेऊन किल्ल्यावर पाऊल टाकलं तर कोणताच किल्ला नुसता एक देखणा डोंगर, पर्यटन स्थळ वाटणार नाही तर इतिहासातला एक महापुरुष आपल्यासमोर आहे असच जाणवेल आणि मग आपण प्रत्येकजण किल्ल्यावरच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊ.
प्लास्टिक बॅग आणि प्लास्टिक बॉटल अश्या गोष्टी कधीच किल्ल्यावर टाकून येणार नाही. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची पण शिखरावर काहीही करून पोहोचलेच पाहिजे असा हट्ट न धरता आपल्या क्षमतेचा मान राखून मागे फिरायचे हे पण निसर्गच शिकवत असतो. ट्रेकिंगमुळे आपण खूप गोष्टी शिकत जातो, ट्रेकिंगला जाताना काय बरोबर घ्यायचे, स्वतःची कशी काळजी घ्यायची अश्या सगळ्या गोष्टी या ट्रेकर्सच्या अनुभवातून वाचायला मिळतील. त्याचबरोबर गडकोटाचे व्यवस्थापन, गिर्यारोहणातल्या करिअर संधी, वेगळ्या वाटेवरचे किल्ले, सहयाद्रीच्या ट्रेकपेक्षा हिमालय ट्रेक कसे वेगळे आहेत, हिमालय ट्रेकची तयारी कशी जास्त करावी लागते. अश्या वेगवेगळ्या ३० लेखांनी दुर्गाच्या देशातून हा दिवाळी अंक सजलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दुर्गाच्या देशातील या अंकातील सर्वात लहान लेखिका असलेल्या १२ वर्षाच्या गिरिजा लांडगेचे लिंगणा आणि वजीर सूळक्या बरोबरचे प्रमोद मोर्तीनी काढलेले सुंदर असं चित्र अंकाच्या मुखपृष्ठावर आहे. संग्रही असावा असा दुर्गाच्या देशातून हा दिवाळी अंक.
दिवाळी अंकः दुर्गांच्या देशातून… महिला विशेषांक
संपादक : संदीप भानुदास तापकीर ९८५०१७९४२१, योगेश भिकुजी काळजे ९८८१००८०१०
पाने : १६८ मूल्यः २५० रुपये फक्त
दुर्गाच्या देशातून यामध्ये महिला ट्रेकरचे लेख आहेत. त्या महिला कोण आहेत जाणून घेण्यासाठी ऐका ऑडिओक्लिपवर…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
2 comments
अत्यंत वाचनीय आणि संग्रही असावा असा हा अंक आहे.. वेगळेपण आणि आपला दुर्ग इतिहास जपून आपण या अंकातून महिलांना अग्रस्थानी ठेवलंत. हे एक प्रकारे महिला सक्षमीकरणच आहे. ‘दुर्गांच्या देशातून’ च्या संपादक आणि सर्व लेखिकांना मानाचा मुजरा!
Great